'त्या' प्राध्यापिकेला राजीनामा देण्याची आली वेळ!
नादिया (पश्चिम बंगाल)
पश्चिम बंगालमधील एका विद्यापीठातील प्राध्यापिकेला नोकरीचा राजीनामा देण्याची वेळ आली. नुकताच या प्राध्यापिकेचा विद्यार्थ्याशी वर्गातच लग्नाचे विधी करतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता. 'मौलाना अब्दुल कलाम आझाद युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी' येथील अप्लाईड सायकॉलॉजी या विभागाच्या विभागप्रमुख यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
या प्रकरणी विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांनी दिलेली माहिती अशी, संबंधित विभागाच्या प्राध्यापिका यांनी, सध्याची परिस्थिती पाहता मानसिकदृष्ट्या खचून गेल्याने, मी यापुढे विद्यापीठाशी संबंध सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शवत राजीनामा दिला. शिवाय त्या प्राध्यापिकांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची अशी संधी दिल्याने विद्यापीठाचे आभार मानले. या प्रकरणासंदर्भात संबंधित प्राध्यापिकांना सक्तीच्या रजेवर जाण्यासाठी सांगितले होते. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर सध्या प्रक्रियेंतर्गत आहे. यावरील विद्यापीठाचा निर्णय आम्ही तुम्हाला कळवू, अशी माहिती रजिस्ट्रार यांनी दिली.
तत्पूर्वी संबंधित प्राध्यापिकेने हा प्रकार हा सायको- ड्रामाच्या एका प्रकल्पाचा भाग होता. यासंबंधित विद्यापीठ आणि संबंधित विद्यार्थ्यांची परवनगी घेतली जाते. असे नमूद केले होते.
याशिवाय त्या संबंधित प्राध्यापिका म्हणाल्या, हा व्हिडीओ काही सहकाऱ्यांनी जाणीवपूर्वक माझी प्रतिमा डागाळण्यासाठी व्हायरल करून माझी बदनामी केली, असा आरोपही केला आहे.
विद्यापीठाकडून संबंधित महिला प्राध्यापिकेला सक्तीच्या सुट्टीवर २९ जानेवारी पासून जाण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान 'MAKAUT' विद्यापीठाने या प्रकरणावर पाच सदस्यीय समितीची नेमणूक केली. सर्व महिला प्राध्यापकांनी आणि त्यांच्या निष्कर्षांमध्ये पॅनेलने प्राध्यापकांच्या दाव्यांचे खंडन केले की व्हिडिओ कागदपत्रांसाठी सायको-ड्रामा प्रकल्पाचा भाग आहे, असे विद्यापीठाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
या व्हिडीओतील प्रकार हा फ्रेशर्सच्या स्वागताच्या कार्यक्रमातील एक निकृष्ट जातीचा विनोद आहे. असे करणे विद्यापीठाच्या शिक्षकांना शोभत नाही, अशी प्रतिक्रियी विद्यापीठाचे कार्यकारी कुलगुरू यांनी यासंदर्भात दिली.