For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागरिकांना जॉगिंग करताना पाहून मन सुखावते

12:10 PM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
नागरिकांना जॉगिंग करताना पाहून मन सुखावते
Advertisement

मंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रतिपादन, 1.12 कोटी खर्चून घातलेल्या सिंथेटिक कार्पेटचे लोकार्पण

Advertisement

वार्ताहर/मडकई

स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानाच्या जॉगर्स पार्कचा नागरिक उठवत असलेला लाभ पाहून मन सुखाहुन जाते. खराब झालेले कार्पेट बदलण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रुपये 1 कोटी 12 लाख खर्चून सिंथेटिक कार्पेट घातलेले आहे. त्याचे आज गुढी पाडव्याच्या शुभदिनी लोकार्पण करीत असल्याचे प्रतिपादन वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले. यावेळी कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, प्रियोळचे जिल्हा सदस्य दामोदर नाईक, सरपंच रामचंद्र नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंते महानंद शेट, यतिन नाईक, अधीक्षक अभियंते प्रदिप गावडे, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे ट्रस्टी मिथील ढवळीकर, उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य सुखानंद गावडे, अजय नाईक, मुक्ता नाईक तसेच बांदोडा व कवळे आजी माजी पंचसदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानंद शेट यांनी जॉगींग करताना काही नियम असतात त्यावर बोट ठेवून, घड्याळाच्या विरुध्द दिशेने जॉगींग करण्यास सांगितले. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदान उभारण्यासाठी केलेल्या संघर्षाचे हे फलीत आहे. दूरदृष्टीचा नेता म्हणून त्यांची गोव्यात ओळख आहे. मडकईत आगामी वर्षात विकासाच्या दृष्टीने खूप बदल झालेला आपणा सर्वांना पाहायला मिळेल, असे गणपत नाईक यांनी सांगितले.

Advertisement

चालण्यासाठी बुटांची सोय

चामड्याच्या बुटाने चालल्यास जॉर्गस पार्क खराब होत असतो. उघड्या पायांनी त्यावर चालल्यास आरोग्याला लाभदायक असते. पण तरी सुध्दा कुणालाही त्यावर जॉगींग करण्यासाठी बुटांची आवश्यकता असल्यास माधवराव ढवळीकर ट्रस्टचे ट्रस्टी मिथील ढवळीकर यांच्याकडे नाव नोंदणी करावी. त्यांना त्यांच्या मोजमापाचे बुट माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे देण्यात येतील, असे यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. युरोपियन टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची, व्यवस्था, कचराकुंडी, वीजेची सोय, अशा विविधांगी सोयी उपलब्ध करुन दिलेल्या आहे. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी अजूनही कुणाच्या सूचना असल्यास जरुर सांगाव्यात. निश्चितच त्यांची समस्या हल केली जाईल, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. मडकईतील काही राहिलेले हॉटमिक्स डांबरीकरण 15 एप्रिलच्या नंतर हाती घेऊन मे महिना पर्यंत हे काम पूर्ण केले जाईल. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत व फलकाचे अनावरण करुन या जॉगींग टॅकचे लोकार्पण केले. स्वागत रामचंद्र नाईक यांनी तर आभार चित्रा फडते यांनी मानले.

Advertisement
Tags :

.