आयटीएफ टेनिस स्पर्धा उद्यापासून
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथील दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर सोमवार दि. 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयटीएफ 300 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत सेंथील कुमार तसेच माया राजेश्वरन् रेवती हे कनिष्ट टेनिसपटू भारताचे नेतृत्व करीत आहेत.
2024 च्या आयटीएफ कनिष्ट टेनिस सर्किट हंगामात सेंथीलकुमारने विविध स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या दिल्लीतील आयटीएफ टेनिस स्पर्धेत मुलांच्या विभागात सेंथीलकुमार, हितेश चव्हाण, अर्णव पापरकर, वरुण वर्मा याने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत युक्रेन आणि तुर्कीचे स्पर्धकही सहभागी होत आहेत. मुलींच्या विभागात फ्रान्सची इनीसेन तसेच पेरीकार्ड यांचा समावेश राहिल. या स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताची रिशीता रे•ाr या एकमेव टेनिसपटूने स्थान मिळविले आहे. इतर टेनिसपटूंना पात्र फेरीमध्ये खेळावे लागणार आहे. पात्र फेरीतून 8 टेनिसपटू प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश करतील.