‘आयटेल’चे अल्फा 3 स्मार्टवॉच लाँच
किंमत 1499 रुपये : 1.5 इंचाचा राहणार राउंड डिस्प्ले : 3 रंगामध्ये उपलब्ध होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टेक कंपनी आयटेलने भारतीय बाजारात आपले नवीन स्मार्टवॉच आयटेल अल्फा 3 सादर केले आहे. कंपनीने या वॉचची किंमत ही 1499 रुपये इतकी ठेवली आहे. हे नवीन स्मार्ट घड्याळ आयपी 7 वॉटर आणि डस्ट प्रूफ रेटिंगसोबत येणार आहे. आयटेल अल्फा 3 मध्ये 1.5 इंच इतक्या आकाराचा गोलाकार डिस्प्ले दिला आहे. सदरचे स्मार्टवॉच डार्क ब्लू, रोज गोल्ड आणि ब्लँक कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. आयटेल अल्फा 3 चा पीक ब्राइटनेस 500 निट्स आहे. म्हणजे थेट सूर्य प्रकाशात चांगल्या प्रकारे डिस्प्ले दिसू शकणार आहे. यासेबतच आयपी67 रेटिंग मुळे धूळ आणि पाणी यांच्यापासून स्मार्टवॉचचे संरक्षण होणार आहे.
आयटेल अल्फामध्ये अन्य फिचर्स :
? 3 मध्ये स्पोर्ट्स अॅक्टिव्हीटीसाठी 100 पेक्षा अधिकचे मोड्स
? यामध्ये 150 पेक्षा अधिकचा वॉचफेस थीमही मिळणार
? स्मार्टवॉचमध्ये पॉवर बॅकअपसाठी 300 एमएएच क्षमतेची बॅटरी
? ब्लूट्यूथ कॉलिंगसाठी सिंगल चिप मिळणार आहे.
? स्मार्टवॉचमध्ये 24 बाय 7 इतका वेळ हार्टरेट ट्रॅकिंग राहणार