For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इटलीचा सिनर उपांत्य फेरीत

06:35 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
इटलीचा सिनर उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तांस्था, माद्रिद (स्पेन)

Advertisement

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या 2026 च्या माद्रिद खुल्या मास्टर्स 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनरने राफा जोदारचा एकेरीत पराभव करत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे. इटलीच्या सिनरने टेनिस क्षेत्रात आणखी एक नवा विक्रम केला आहे. एटीपी टूरवरील प्रत्येक वर्षी होणाऱ्या 1000 दर्जाच्या 9 एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम सिनरने केला आहे.

पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेनिक सिनरने स्पेनच्या 19 वर्षीय राफा जोदारचा 6-2, 7-6 (7-0) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना दोन तास चाललाहोता. सिनरने पहिला सेट 6-2 जिंकल्यानंतर जोदारने दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबविला. सिनरने या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे तसेच एटीपी टूरवरील मास्टर्स 1000 दर्जाच्या सर्व म्हणजे 9 स्पर्धांमध्ये 1990 नंतर उपांत्य फेरी गाठणारा सिनर हा सहावा टेनिसपटू आहे. यापूर्वी असा पराक्रम स्पेनचा नादाल, स्वीसचा रॉजर फेडरर, ब्रिटनचा अॅन्डी मरे आणि जर्मनीचा व्हेरेव यांनी पराक्रम केला आहे. सिनरने माद्रिद टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी गाठताना ब्रिटनच्या कॅमेरुन नुरीचा 6-2, 7-5 असा फडशा पाडला  होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.