इटलीचा सिनर अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या पॅरिस मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या द्वितीय मानांकित जेनिक सिनरने जर्मनीच्या व्हेरेव्हचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. सिनर आणि कॅनडाचा अॅलिसिमे यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्यफेरीच्या सामन्यात सिनरने व्हेरेव्हचा 6-0, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कॅनडाच्या अॅलिसिमेने कझाकस्तानच्या अॅलेक्झांडर बुबलिकचा 7-6 (7-3), 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. एटीपीच्या ताज्या मानांकनात अग्रस्थान मिळविण्यासाठी व्हेरेव्हला ही स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे आहे. सध्या स्पेनचा अल्कारेझ मानांकन यादीत पहिल्या स्थानावर आहे. इटलीतील ट्यूरिन येथे होणाऱ्या एटीपी फायनल्स स्पर्धेत आठवे आणि शेवटचे स्थान मिळविण्यासाठी कॅनडाच्या अॅलिसिमेला पॅरिसमधील ही स्पर्धा जिंकावी लागेल.