समजत होते आळशी, निघाला दुर्लभ आजार
आपण सर्वांनी बालपण दिवसभर झोपून राहणाऱ्या राजकन्येची गोष्ट ऐकली असेल, स्लीपिंग ब्युटी केवळ कहाण्यांमध्ये असतात किंवा खऱ्याखुऱ्या आयुष्यात इतके कोण झोपू शकते असा प्रश्न विचारला जातो. परंतु असे घडत नसल्याचे तुम्हाला वाटत असेल तर एका युवतीची कहाणी जाणून घेणे गरजेचे ठरणार आहे. या युवतीला नेहमीच झोप येत असते. ती कितीही झोपली तरीही तिला पुन्हा झोपावे असे वाटत राहते.
अलीसा डेव्हिस नावाच्या या युवतीला सदैव झोप येते आणि तिला नेहमीच थकल्यासारखो जाणवते. ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे, तरीही तिच्यासमोर ही विचित्र स्थिती निर्माण होते. ती केवळ 26 वर्षांची असून सदैव झोपून राहत असल्याने तिला लोकांकडून बोलणं ऐकावे लागते. डॉक्टरांनीही तिला आळशी मानले होते.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी असीला पेशाने डिजिटल मार्केटर आहे. परंतु ती सदैव थकलेली असल्याने स्वत:चे डोळे बंद केल्याशिवाय राहू शकत नाही. स्वत:ची ही समस्या घेऊन ती डॉक्टरांकडे गेल्यावर प्रारंभी त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यांनी तिला कॉफी पिण्याचा सल्ला दिला होता. परंतु क्लीनिकल स्लीप स्टडीमध्ये तिने भाग घेतल्यावर तिला दुर्लभ आजार असून याला आयडियोपॅथिक हायपरसोम्निया म्हटले जात असल्याचे समोर आले.
काय आहे हा आजार?
आयडियोपॅथिक हायपरसोम्निया प्रत्यक्षात एक अशी स्थिती आहे, ज्यात प्रचंड झोप येते. 10 लाख लोकांपेकी केवळ 50 जणांना हा आजार होत असतो. स्लीप फौंडेशननुसार याच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, उभे राहिल्यावर चक्कर येणे, ब्रेन फॉग आणि स्लीप पॅरालिसिस सामील आहे. छोटे काम करण्यासही कित्येक तास लागणे आणि दिवसा 10-12 तास आणि कधीकधी 14 तास झोपणे देखील याचे लक्षण आहे. अशाप्रकारच्या लक्षणांसोबत सामान्य जीवन जगणे अजिबात सोपे नाही.