महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ब्रेन वॉश’ करणाऱ्या महिलेनेच तुरुंगात पोचवले फोन, सीमकार्ड

10:13 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलवाळ तुरुंगातील प्रकाराने खळबळ

Advertisement

पणजी : कोलवाळ मध्यवर्ती तुऊंगात कारागृस मंत्रालय अंतर्गत कैद्यांचे ब्रेन वॉश करण्याच्या कामासाठी नियुक्त केलेल्या एका महिलेने तुरुंगातील एका रशियन कैद्याला मोबाईल व सीमकार्ड पुरविण्याचा प्रयत्न केला असता तिला तुरुंगातील आयआरबी पोलासंनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अद्याप तक्रार नोंद झाली की नाही तेही समजू शकले नाही. काल गुरुवारी रात्री 8.37 पर्यंत तुऊंग महानिरीक्षकांनाही या प्रकरणाबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे की काय, असा संशय निर्माण झाला आहे.

Advertisement

पदाचा घेतला गैरफायदा

कारागृहात शिक्षा भागणाऱ्या कैद्याना शिक्षण तसेच इतर कामाबाबत माहिती देणे, त्यांच्यात माणुसकी जागी करून त्यांना सुधारण्यासाठी जागृत करणे यासाठी कारागृह मंत्रालय अंतर्गत प्रत्येक राज्यातील कारागृसाठी काही लोकांची नियुक्ती केली जाते. गोव्यातही अशा लोकांची नियुक्ती केली आहे. संशयित महिलेची अशा व्यक्तींमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र तिने त्याचा गैरफायदा घेऊन चक्क कैद्यांना फोन, सीमकार्ड पुरविण्याचा प्रयत्न केला. कारागृह मंत्रालयाने नियुक्त केलेल्या लोकांना कैद्यापर्यंत जाण्याची मूभा असते. अधुनमधुन हे लोक तुऊंगात येतात आणि कैद्यांना मार्गदर्शन करतात. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुऊ आहे. त्यामुळे संशयित महिलेने या अगोदर कितीवेळा तुऊंगात कायकाय पोहचविले, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article