For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयटी समभाग पुन्हा चमकले

06:46 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयटी समभाग पुन्हा चमकले
Advertisement

मुंबई :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून आयटी समभागांमध्ये दबाव दिसला होता. पण बुधवारच्या सत्रात आयटी समभागांमध्ये पुन्हा चमक पाहायला मिळाली. 24 फेबुवारी रोजी आयटी समभागांमध्ये मोठी घसरण दिसली होती. बुधवारी मात्र टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो, एलटीआय माइंडट्री सारख्या आयटी समभागांनी तेजी राखल्याने सकाळी 11.15 वाजता आयटी निर्देशांक 2.48 टक्के इतका तेजीत होता. देशातील दिग्गज आयटी कंपनी टीसीएसचा समभाग इंट्रा डे दरम्यान 2.85 टक्के वाढत 2647 रुपयांवर तर इन्फोसिसचा 2.47 टक्के वाढत 1306 रुपयांवर पोहचला.

Advertisement
Advertisement
Tags :

.