महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निष्पक्ष अन् पारदर्शक न्या व्हावा

06:31 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केजरीवाल अटक प्रकरणी अमेरिकेची प्रतिक्रिया

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर जर्मनीनंतर आता अमेरिकेनेही आक्षेप व्यक्त केला आहे. भारतातील प्रमुख विरोधी पक्षनेते केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी नजर ठेवून असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारतात निष्पक्ष कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल अशी अपेक्षा करत असल्याचे वक्तव्य अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्याने केले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत निष्पक्ष, पारदर्शक आणि कालबद्ध कायदेशीर प्रक्रियेची आम्ही अपेक्षा करतो असे अमेरिकेकडून म्हटले गेले आहे. केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या वक्तव्यानंतर भारताने जर्मनीच्या राजदूताला पाचारण करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

केजरीवाल यांच्यासंबंधी जर्मनीच्या भूमिकेवर भारताने आक्षेप घेतला होता. याप्रकरणी जर्मनी आणि भारत सरकार यांच्यात काय चर्चा होतेय हे केवळ जर्मनीचे विदेश मंत्रालय सांगू शकते असे अमेरिकेच्या विदेश विभागाने म्हटले आहे.

जर्मनीची प्रतिक्रिया

अबकारी घोटाळ्याप्ररणी केजरीवाल यांना अटक झाल्यावर जर्मनीने याप्रकरणी पूर्ण कारवाई निष्पक्ष व्हायला हवी आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांना कुठल्याही अडथळ्यांशिवाय कायदेशीर मार्ग अवलंबिण्याचा अधिकार मिळावा असे म्हटले होते. भारत एक लोकशाहीवादी देश असून न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि मूलभूत लोकशाही तत्वांशी संबंधित मापदंड या प्रकरणी लागू केले जातील अशी अपेक्षा असल्याचे जर्मनीच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सेबेस्टियन फिशर यांनी म्हटले होते.

भारताचा आक्षेप

केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी जर्मनीने केलेल्या टिप्पणीप्रकरणी भारताने तीव्र आक्षेप नोंदविला होता. भारताने जर्मनीच्या राजदूताला पाचारण करत स्वत:ची नाराजी व्यक्त केली होती. जर्मनीची टिप्पणी ही भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये चुकीचा हस्तक्षेप असल्याचे भारताने सुनावले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article