कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur : आयटी पार्कला कारखान्याची - एनटीपीसीची होणार अडचण !

05:14 PM Nov 04, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

   होटगीजवळ आयटी पार्कला विरोध

सोलापूर
: जिल्हा प्रशासनाकडून होटगी गावाजवळील शासकीय जागेत आयटी पार्क उभारणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या ठिकाणी आयटी पार्क उभारल्यास सिध्देश्वर साखर कारखाना व एनटीपीसी या दोन कारखान्याच्या प्रदूषणाचा परिणाम आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यावर होणार आहे. त्यामुळे याठिकाणी आयटी पार्क उभारण्यात येऊ नये, अशी मागणी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी केली आहे.

Advertisement

विमानतळामुळे आयटी पार्कसाठी उंच इमारती बांधता येणार नाही. त्यामुळे नवीन विकासक गुंतवणूक करणार नाहीत, अशी भूमिकाही शहा यांनी घेतली आहे. कुमठे येथील सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीची दुर्गंधी नेहमी या परिसरात असते, याशिवाय सिमेंटचे ४ कारखाने त्याच रस्त्यावर पुढे असल्याने प्रदूषण राहणार असल्याचेही शहा यांनी सांगितले.

Advertisement

होटगी तलाब ओव्हरफ्लो झाल्यावर रस्ता बंद होतो. साखर कारखाना - चालू असताना चिमणीतून काजळी उडते. याठिकाणी न एक सुद्धा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग जवळून जात नाही, केबळा सरकारी जागा पडून आहे म्हणून जिल्हाधिकारी ती जागा सुचवत आहेत, असे मतही शहा 5 यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
#DevelopmentDebate#EnvironmentConcern#ITPark#PollutionAlert#solapur#SolapurVikasManch#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaSiddheshwarFactory
Next Article