For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायालयातील प्रकरणे मध्यस्थीने मिटविणे शक्य!

12:48 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
न्यायालयातील प्रकरणे मध्यस्थीने मिटविणे शक्य
Advertisement

वाळपई न्यायाधीश वसिम रिझवी : वाळपईत मोफत कायदा सल्ला शिबिर

Advertisement

वाळपई : छोटी मोठी भांडणे अनेकवेळा पोलीस स्थानकात जातात. त्यानंतर न्यायालयामध्ये याचे आरोपपत्र दाखल होऊन दोन्ही बाजूच्या आशिलांचा वेळ जात जातो. पैसे खर्च होतात. मानसिक त्रास होतो. यामुळे शक्मयतो मध्यस्तीतून अशी प्रकरणे  मिटविल्यास दोन पक्षांचा वेळ, खर्च वाचतो. दोघांनाही जिंकल्याचा आनंद मिळतो, असे प्रतिपादन ााळपई प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायमूर्ती वासिम रिझवी यांनी केले. कायदेशीर प्रक्रियेमध्ये मध्यस्थीला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. भारतीय समाजासाठी मध्यस्थी प्रक्रिया नवीन नसून महाभारत काळापासून मध्यस्थी प्रक्रिया समाजाला माहित आहे. यामुळे मध्यस्तीच्या माध्यमातून न्यायालयातील अनेक प्रकरणे मिटविणे शक्मय आहे, असेही ते म्हणाले.

मोफत कायदा सल्ला शिबिर अंतर्गत न्यायालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर अॅड. राजन सावईकर, अॅड. रेश्मा नाईक चोरलेकर यांची खास उपस्थिती होती. यावेळी न्यायमूर्ती वसीम रिजवी यांनी मध्यस्थी संदर्भात कशाप्रकारे प्रकरणे हाताळण्यात येत असतात. यामुळे दोन्ही पक्षकरांचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो याची सविस्तरपणे माहिती दिली. प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून वेगवेगळ्या न्यायालयाचे न्यायाधीश प्रशिक्षण देऊन तसेच काही वकील प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून नियुक्त केलेले आहेत. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दोन्ही पक्षकार आपला खटला मध्यस्थीद्वारे सुटावा अशी न्यायालयाला विनंती करेल किंवा न्यायालयास वाटत असेल की एखादा खटला मध्यस्थीद्वारे सोडविणे शक्मय आहे तर न्यायालय किंवा पक्षकार आपला खटला मध्यस्थीद्वारे सोडवण्याची विनंती करू शकतो, असेही न्यायमूर्ती वसीम रिजवी म्हणाले. प्रस्ताविक अॅड. राजन सावईकर यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक वकील व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.