महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

व्हॅक्सिन डेपोचे सौंदर्य अबाधित राखणे गरजेचे

10:47 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भंगारात ठेवलेली वाहने हटविणे आवश्यक : प्रशासनाकडून रक्षणाची सामाजिक कार्यकर्त्याकडून मागणी

Advertisement

बेळगाव : शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपो परिसराचे सौंदर्य अबाधित ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी अनेक प्राणी, पक्षी यांचा वावर आहे. परंतु, येथे वाढलेल्या अमर्याद झुडपांमुळे सापांचा वावरही वाढला आहे. दररोज फिरावयास येणाऱ्या नागरिकांना त्यांची इजा होऊ शकते. लोकांनीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. अलीकडेच या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या जुन्या व नादुरुस्त तसेच भंगारात देण्यायोग्य वाहनांच्यानजीक साप आढळून आला. या ठिकाणी ठेवलेल्या काही वाहनांमध्ये पांघरुण आढळून आले असून बहुधा त्या वाहनांचा वापर निवासासाठी केला जात असल्याचा संशय आहे. अलीकडेच येथे बांधण्यात आलेले ग्लास हाऊससुद्धा दुर्लक्षित झाले असून काचांना तडे गेले आहेत.
Advertisement

 सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

अशा अनेक ठिकाणी जुनी वाहने ठेवण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ वडगाव येथील तालुका आरोग्य कार्यालय, बिम्सचे आवार, शिवाय व्हॅक्सिन डेपो अशा ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नादुरुस्त वाहनांचा लिलाव करून ती वाहने हटविणे गरजेचे आहे. अन्यथा अशा वाहनांची दुरुस्ती करून त्यांचा वापर तरी करणे आवश्यक आहे. एकूणच व्हॅक्सिन डेपो परिसराचे प्रशासनाने रक्षण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article