For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ वाजविणे बंधनकारक

12:37 PM Jan 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ वाजविणे बंधनकारक
Advertisement

बेंगळूर : मुलांना पाणी पिण्याबाबत वेळोवेळी जाणीव करून देण्यासाठी ‘पाण्याची घंटा’ (वॉटर बेल) वाजविणे बंधनकारक करणारा आदेश राज्य शालेय शिक्षण खात्याच्या ‘पीएम पोषण शक्ती निर्माण’ विभागाच्या संचालकांनी जारी केला आहे. आरोग्य, शारीरिक विकासाच्या दृष्टीने मुलांनी नियमितपणे विशिष्ट प्रमाणात पाणी प्राशन करणे आवश्यक असते. मात्र बऱ्याचदा मुलांना याची जाणीव नसते. त्यामुळे शाळेच्या कालावधीतच मुलांना पाणी पिण्याची जाणीव निर्माण करून देणे ही शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांनी वॉटर बेलसंबंधी शिक्षण खात्याच्या नियमांचे पालन करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. अशुद्ध पाण्यापासून फैलावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत शाळांनी खबरदारी घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.