For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रँड कोल्हापूर म्हणून ओळखणं जाणं हाच खूप मोठा सन्मान

06:26 PM Nov 16, 2023 IST | Kalyani Amanagi
ब्रँड कोल्हापूर म्हणून ओळखणं जाणं हाच खूप मोठा सन्मान
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

ब्रँड कोल्हापूर म्हणून ओळखणं जाणं हाच खूप मोठा सन्मान आहे, असं प्रतिपादन निवृत्त मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी केलं. ते सयाजी हॉटेलच्या मेघमल्हार सभागृहात आयोजित केलेल्या ब्रँड कोल्हापूर बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्य वन संरक्षक सुनील लिमये हे उपस्थित होते. यावेळी हॉकी आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल कुमार आगळगावकर आणि कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा कलेचा वारसा जोपासणाऱ्या त्यांच्या कन्या यांच्या भरतकाम मधील उल्लेखनीय कामाबद्दल जीवन गौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर एकूण विविध क्षेत्रातील सहा जणांना विशेष पुरस्कार आणि साठ जणांना ब्रॅण्ड कोल्हापूर यांनी गौरविण्यात आलं.

ब्रँड कोल्हापूर ही आ. सतेज पाटील यांची संकल्पना आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कोल्हापूरच्या या सुपुत्रांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने 'ब्रँड कोल्हापूर' हा सन्मान देण्याचा उपक्रम मागील पाच वर्षापासून राबिविण्यात येत आहे. कोल्हापूरचं नाव विविध क्षेत्रातून पुढं नेणाऱ्या या दिग्गजांचा सत्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ब्रँड कोल्हापूर कमिटीचे सदस्य भरत दैनी यांनी प्रास्ताविक केलं. यामध्ये त्यांनी ब्रँड कोल्हापूरची सुरुवात ते आता अपर्यंतचा प्रवास उलघडला. सदस्या अनुराधा कदम यांनी प्रमुख पाहुण्याची ओळख करून दिली. तर प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी सर्व सत्कारमूर्तींच्या कार्याचा परिचय करून दिला.

Advertisement

यावेळी बोलताना निवृत्त मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी, कोल्हापूर मधील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कोल्हापूर कर जातीभेद -राजकीय भेद बाजूला ठेवून कोल्हापूरच्या हितासाठी एकत्र येतात ही अभिमानास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. सामाजिक भान असलेले आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे व्यक्तिमत्व कोल्हापूरला लाभल्याचा आनंद आहे. आज देण्यात येणारा पुरस्कार हा फक्त पुरस्कार नाही, ब्रॅण्ड कोल्हापूर म्हणून ओळखलं जाणं हाच सगळ्यात मोठा सन्मान असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.

आमदार सतेज पाटील यांनी, इतिहास घडवताना इतिहास विसरून चालणार नाही, तुम्ही विविध क्षेत्रात कर्तृत्ववान आहात आणि तुम्ही कोल्हापूरचे आहात याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितलं. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण करताना सर्वांचा आशीर्वाद लाभला, पुढाकार घेऊन काम पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केला. येणाऱ्या काळात कोल्हापूरसाठी काय करता येईल, कोल्हापूरचं नाव कसं मोठं करता येईल, यावरती भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. यासाठी कोल्हापूरचं नाव आणखीन उंचावण्यासाठी कोल्हापूर ब्रँड म्हणून तुमची सगळ्यांची जबाबदारी महत्त्वाची ठरेल. सध्या स्पर्धा भयानक आहे, यासाठी तुमचा संघर्षमय प्रवास सर्वांसाठी आदर्शदायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार ऋतुराज पाटील यांनी, मातीशी नातं घट्ट असलेल्या सुनील लिमये यांच्या हस्ते पुरस्कार वितरित होत आहे त्यामुळे याची उंची आणखीन वाढली आहे. यानिमित्तानं कोल्हापूरचे हे सर्व रत्न एकत्र हे अभिमानास्पद गोष्ट असल्याचं सांगितलं. कोल्हापूर मधील युवक युवतींसाठी अलीकडे मिशन रोजगार सारख्या विविध योजना राबवून त्यांना बळ देण्याचं काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी दिली. येणाऱ्या काळात कला, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रासाठी सर्वांचा मागणीचा विचार करून त्यांची पूर्तता करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यानंतर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये सुरुवातीला हॉकी आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल कुमार आगळगावकर आणि कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा कलेचा वारसा जोपासणाऱ्या त्यांच्या कन्या यांच्या भरतकाम मधील उल्लेखनीय कामाबद्दल जीवन गौरव पुस्काराने सन्मानित करण्यात आलं. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि कोल्हापूरचे नाव मोठं करणारे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आलं. यामध्ये दिव्यांग खेळाडू स्वप्नील पाटील याला अर्जुन अवार्ड मिळाल्या बद्दल, पैलवान सिकंदर शेख याला महाराष्ट्र केसरी 'किताब मिळाळ्याबद्दल, शाहीर राजू राऊत यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल, सचिन सूर्यवंशी यांना वारसा डॉक्युमेंट्रीसाठी फिल्म फेअर मिळाल्याबद्दल, वैष्णवी पाटील हिची भारतीय रग्बी संघातनिवड झाल्या बद्दल, सचिन कुंभोजे यांची फिनलँड येथील स्टार्टअप मधील, स्लश २०२३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवणाऱ्या एकूण ६० जणांचा ब्रँड कोल्हापूर पररस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी अनेक पुरस्कार विजेत्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतात, ब्रँड कोल्हापूरचे आभार व्यक्त करत, कोल्हापूरकरांकडून कोल्हापूरकरांचा सत्कार हा सर्वोच्च सन्मान असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान उपस्थित सर्व असोसिएशन, विविध संघटना आणि नागरिकांनी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण करून कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्ती केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सकाळचे संपादक निखिल पंडितराव, राजकुमार चौगुले, राजू यादव, यांच्यासह विविध संघटना, असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, हितचिंतक, नागरिक आदी मोठ्या संख्येनं होते.

Advertisement

.