For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयटी निर्देशांकाने शेअरबाजारात बिघडला मूड

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयटी निर्देशांकाने शेअरबाजारात बिघडला मूड
Advertisement

सेन्सेक्स 303 अंकांनी घसरणीत, आयटी निर्देशांकाची मोठी पडझड

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीचा फटका भारतीय शेअरबाजाराला बुधवारी बसलेला दिसून आला. मंगळवारी शेअरबाजारात तेजी होती. आयटी निर्देशांक 5.5 टक्के आणि रियल्टी 1.3 टक्के इतका घसरणीत राहिला होता. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 303 अंकांनी घसरत 74346 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 77 अंकांच्या घसरणीसोबत 23405 अंकांवर बंद झाला. निफ्टी आयटी निर्देशांक सर्वाधिक घसरलेला होता. हा निर्देशांक 1732 अंकांनी कोसळत 29384 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकाने मात्र तेजी राखत बाजाराला आधार दिला होता. हा निर्देशांक 471 अंकांनी वाढून 54185 अंकांवर बंद झाला.

Advertisement

हे समभाग वधारले

अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स पीव्ही, एसबीआय, मॅक्स हेल्थकेअर, ट्रेंट, आयसीआयसीआय, इंडिगो, भारती एअरटेल, टाटा स्टील, ओएनजीसी, अॅक्सिस बँक, कोल इंडिया, मारुती सुझुकी, पॉवरग्रिड कॉर्प, ग्रासिम, एशियन पेंटस्, महिंद्रा आणि महिंद्रा, श्रीराम फायनान्स यांचे समभाग मजबूतीसोबत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकातील वोडाफोन आयडिया, एमआरपीएल, मॅनकाइंड, फेडरल बँक, इंडियन  बँक, बाळकृष्ण इंडस्ट्रिज यांचे समभागही तेजी राखत बंद झाले होते.

हे समभाग घसरले

दरम्dयान टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी, इटर्नल, सनफार्मा, रिलायन्स, बीईएल, नेस्ले, जियो फायनान्स, डॉ. रे•िज लॅब्ज, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट, बजाज ऑटो, लार्सन टुब्रो, एसबीआय लाइफ, टाटा कंझ्युमर, हिंडाल्को, एनटीपीसी, सिप्ला यांचे समभागही कमकुवत होत बंद झालेले दिसले. मिडकॅपमध्ये पाहता कोफोर्ज, केपीआयटी टेक्नॉ., एमफासिस, टाटा इएलएक्सएसआय, पीबी फिनटेक, पर्सिस्टंट सिस्टम्स यांचे समभाग दबावात होते.

क्षेत्रांची कामगिरी

विविध क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास ऑटो, एनर्जी, सीपीएसई, फायनॅन्शीयल्स व फार्मा यांचे निर्देशांक तेजीत होते. तर कमोडिटीज, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस, रियल्टी यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले होते.

  • अपोलो हॉस्पिटल 8299
  • टाटा मोटर्सपीव्ही 398
  • इंडिगो              4550
  • मॅक्स हेल्थकेअर  965
  • सबीआय            971
  • आयसीआयसीआय  1243
  • ओएनजीसी         268
  • पॉवरग्रिड कॉर्प    284
  • कोटक बँक        382
  • ट्रेंट                   4242
  • एचडीएफसी बँक 753
  • अॅक्सिस बँक       1257
  • टाटा स्टील         211
  • कोल इंडिया       474
  • भारती एअरटेल   1821
  • महिंद्रा-महिंद्रा       3007
  • श्रीराम फायनान्स   914
  • मारुती सुझुकी    13038
  • टायटन               4082
  • ओला इलेक्ट्रीक   43
  • आर आर केबल   2155

  • टीसीएस             2245
  • टेक महिंद्रा         1470
  • एचसीएल टेक     1177
  • इन्फोसिस           1220
  • विप्रो                  203
  • आयटीसी           276
  • इटर्नल                246
  • लार्सन टुब्रो         3946
  • अदानी एंटरप्रायझेस 2929
  • जियो फाय.           234
  • एसबीआय लाइफ 1781
  • टाटा कंझ्युमर्स    1143
  • डॉ. रे•िज लॅब्ज      1261
  • एचडीएफसी लाइफ  574
  • अल्ट्राटेक सिमेंट  11066
  • नेस्ले इंडिया        1387
  • अदानी पोर्टस्      876
  • बजाज फायनान्स 882
  • हिंडाल्को           1139
  • आयशर मोटर्स    7105
  • पर्सिस्टंट सिस्टम्स 5097
  • एलटीएम            4052
Advertisement
Tags :

.