For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वरनचे शतक, कंबोजचे 5 बळी

06:48 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईश्वरनचे शतक  कंबोजचे 5 बळी
Advertisement

वृत्तसंस्था /अनंतपूर

Advertisement

2024 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू झालेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात अभिमन्यु ईश्वरनच्या शानदार शतकाच्या जोरावर इंडिया ब संघाने पहिल्या डावात 101 षटकात 7 बाद 309 धावा जमविल्या. तत्पूर्वी इंडिया क संघाने पहिल्या डावात 525 धावांचा डोंगर उभा केला होता. इंडिया ब संघातील अनशुल कंबोजने 66 धावांत 5 गडी बाद केले.

या सामन्यातील शनिवारी खेळाचा तिसरा दिवस कर्णधार अभिमन्यु ईश्वरनच्या नाबाद शतकाने गाजला. इंडिया क संघाने पहिल्या डावात 525 धावा जमविल्यानंतर इंडिया ब संघावर अधिकच दडपण आले होते. इंडिया ब संघाने बिनबाद 124 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली. ईश्वरनने 262 चेंडूत नाबाद 143 धावा झळकविल्या. नारायण जगदीशनने 70 धावांचे योगदान दिले. जगदीशन आणि ईश्वरन यांनी 129 धावांची भागिदारी केली. कंबोजच्या अचूक गोलंदाजीसमोर इंडिया बची एकवेळ स्थिती 5 बाद 194 अशी होती. वॉशिंग्टन सुंदरने 13 तर साई किशोरने 21 धावा जमविल्या. कंबोजने मुशिरखान आणि सर्फराज खान या बंधूंना अनुक्रमे 1 आणि 16 धावांवर बाद केल्यानंतर त्याने रिंकू सिंग व रे•ाr यांचे बळी मिळविले. शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर इंडिया ब संघ अद्याप 216 धावांनी पिछाडीवर असून त्यांना संभाव्य फॉलोऑन टाळण्यासाठी आणखी 66 धावांची गरज आहे. तसेच त्यांचे तीन गडी खेळावयाचे आहेत. या सामन्यात इंडिया क संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने इंडिया बला फॉलोऑन देवून पराभूत केले. तर इंडिया क संघाला या सामन्यात 6 गुण मिळतील.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: इंडिया क प. डाव 124.1 षटकात सर्वबाद 525, इंडिया ब प. डाव 101 षटकात 7 बाद 309 (ईश्वरन खेळत आहे 143, जगदीशन 70, कंबोज 5-66)

Advertisement
Tags :

.