कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्तंबूल भूकंपाने हादरले

06:35 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6.2 रिश्टर स्केल तीव्रता : तासाभरात तीनवेळा हादरे : मरमारा समुद्रात केंद्रबिंदू

Advertisement

वृत्तसंस्था/ अंकारा

Advertisement

तुर्कीमधील इस्तंबूल येथे बुधवारी 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र इस्तंबूलमधील सिलिवरीजवळ मरमारा समुद्रात होते. हा परिसर भूकंपाच्या हालचालींसाठी ओळखला जाणारा किनारी भाग आहे. या भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे तुर्कीच्या आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने बुधवारी सांगितले. तथापि, जोरदार हादऱ्यांमुळे बऱ्याच लोकांनी मोकळ्या मैदानावर जाणे पसंद केले. या भूकंपामुळे धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य न करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

भूकंपामुळे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार हादरे बसले. एका तासात तीन मोठे भूकंप जाणवल्याचे सांगण्यात आले. पहिला हादरा 3.9 रिश्टर स्केल असून तो स्थानिक वेळेनुसार 12:13 वाजता झाला. दुसरा भूकंप स्थानिक वेळेनुसार 12:49 वाजता झाला. त्याची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल होती. 12:51 वाजता झालेला तिसरा भूकंप 4.4 तीव्रतेचा होता. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनेही भूकंपाची पुष्टी केली आहे. याचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 22,765 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 75,000 हून अधिक लोक जखमी झाले होते. केवळ तुर्कीमध्ये 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 35 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article