For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गो-हत्या रोखण्यासाठी कठोर आदेश द्या

01:10 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गो हत्या रोखण्यासाठी कठोर आदेश द्या
Advertisement

विश्व हिंदू परिषद, बजरंद दलची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात बेकायदेशीररित्या गो-तस्करी आणि गो-हत्या प्रकार सुरूच आहेत. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. कर्नाटक पशुहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक 2020 लागू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी गो-हत्या सुरू आहेत. यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे बेकायदेशीररित्या होणारी गोतस्करी व गो-हत्या रोखण्यासाठी कठोर आदेश जारी करण्यात यावेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.

निवेदनात, हिंदू संस्कृतीत गायीला अत्यंत पूजनीय स्थान असून 33 कोटी देवदेवतांच्या बरोबरीने गो-मातेची पूजा केली जाते. त्यामुळे गोहत्येच्या घटनांमुळे हिंदू समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या जात असून समाजात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत आहे. कर्नाटक पशुहत्या प्रतिबंध व संरक्षण कायद्यांतर्गत गोहत्या आणि गोतस्करीवर बंदी असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी हे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे तालुका व जिल्हास्तरावर पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश देऊन बेकायदेशीर गोतस्करी आणि गोहत्या रोखाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

29 मेपर्यंत बाजारावर बंदी घाला

तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गोहत्याऱ्यांवर कठोर कारवाई करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत. गो-मातेचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांवर तपासणी पथके नियुक्त करून पोलीस विभागामार्फत विशेष तपासणी नाके उभारावेत. याशिवाय 29 मेपर्यंत गोविक्री आणि जनावर बाजारावर बंदी घालण्याचे आदेश जारी करावेत. कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करणाऱ्या गो-रक्षकांना प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य आणि मदत उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.