For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा नाट्यामय वळणावर

10:47 AM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा नाट्यामय वळणावर
Advertisement

दिल्लीत शिवकुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट : राजकीय घडामोडींसह अनेक विषयांवर चर्चा

Advertisement

बेंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सुरू असलेला अधिकार हस्तांतरणाचा संघर्ष आता नाट्यामय वळणावर पोहोचला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नवी दिल्लीत मोर्चेबांधणी करीत असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी काँग्रेस वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे राज्य काँग्रेस गोटात तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. राज्य राजकारणातील सर्व घडामोडींची माहिती त्यांनी राहुल गांधींच्या नजरेस आणून दिली आहे. अधिकार हस्तांतरण, नेतृत्व बदल, प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद यासह सर्व घडामोडींविषयी त्यांनी राहुल गांधींशी चर्चा केल्याने शिवकुमारांच्या दिल्ली भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणाऱ्या डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी दिल्लीत प्रथम प्रियांका वड्रा आणि नंतर सोनिया गांधी यांची भेट घेतली. आसाम निवडणुकीच्या चर्चेनंतर शिवकुमार यांनी राहुल गांधींशी राज्य राजकारणावर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. राजकारणावर डी. के. शिवकुमार यांनी राहुल गांधींशी चर्चा केली तेव्हा काँग्रेस वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका वड्रा या देखील उपस्थित होत्या. या तिघांशीही दीर्घ चर्चा करून डी. के. शिवकुमार यांनी आपली पक्षनिष्ठा आणि पक्षसेवा त्यांच्या लक्षात आणून दिली. तसेच आपल्या प्रयत्नांना फळ देण्याची विनंती केली आहे, असे म्हटले जात आहे.

Advertisement

राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यावर झालेल्या सत्तावाटप करारानुसार आपण सर्वांनी वागले पाहिजे. त्यानुसार आपल्यालाही उच्च पद देण्यात यावे, अशी विनंती डी. के. शिवकुमार यांनी वरिष्ठांकडे केल्याचे समजते. सत्ता वाटपाचा वाद लवकरात लवकर सोडवला पाहिजे. लवकरच स्पष्ट निर्णय जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची विनंती ऐकल्यानंतर राहुल गांधी यांनी, तुमची पक्षनिष्ठा आणि सेवा आमच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला तुमच्याबद्दल प्रेम आणि कौतुक आहे. आम्ही शक्मय तितक्मया लवकर निर्णय घेऊ, कृपया धीराने वाट पहा, असे सांगितल्याचे समजते.

सध्या सत्तावाटपावर निर्णय घेणे शक्मय नाही. आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याशी बोलू. यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राहुल आणि सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांना दिल्याचे समजते. वरिष्ठ नेत्यांनी बोलाविल्याने दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत वाट पाहत होते. बुधवारी राहुलना भेटण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. पण गुरुवारी सकाळीच त्यांनी राहुल गांधी यांना भेटून चर्चा केली. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता दिल्लीतील जनपथ रोडवरील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका वड्रा या देखील उपस्थित होत्या. काँग्रेसच्या या तीन वरिष्ठ नेत्यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा केल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.

वरिष्ठांना मी सर्वकाही सांगितले

मी वरिष्ठांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलो आहे. पक्षाच्या वरिष्ठांना जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. गुरुवारी दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका वड्रा यांची भेट घेऊन सर्व घडामोडींविषयी चर्चा केली आहे.

- डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.