लेह-लडाख येथे इस्रोची अॅनालॉग मोहीम प्रक्षेपित
वृत्तसंस्था/ लडाख
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी लेह, लडाख येथून भारताची पहिली अॅनालॉग अंतराळ मोहीम जारी केली. इस्रोने या मोहिमेचे नेतृत्व केले असून ‘आका’ स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ, आयआयटी बॉम्बे यांच्या भागीदारीत ते विकसित केले आहे. तसेच लडाख स्वायत्त टेकडी विकास परिषदेचेही या मोहिमेत सहकार्य लाभले आहे. आंतरग्रहीय अधिवासांमध्ये जीवनाचे अनुकरण करणे आणि पृथ्वीच्या पलिकडे बेस स्टेशन स्थापन करण्याच्या आव्हानांचा शोध घेणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
अॅनालॉग मोहीम मंगळ आणि चंद्रासारख्या परिस्थितीचे अनुकरण करण्याच्या दिशेने एक नवीन पाऊल आहे. ही मोहीम भारताच्या गगनयान कार्यक्रम आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाला समर्थन देण्यासाठी मौल्यवान डेटा प्रदान करेल. @नालॉग मोहिमांमुळे मानव, रोबोट आणि तंत्रज्ञान अवकाशासारख्या परिस्थितीत कसा प्रतिसाद देऊ शकतात, हे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना समजू शकेल.