इस्रोचे 7 उपग्रह ठरले भारतीय सैन्याचे नेत्र
पाकिस्तानी सैन्यतळ-लाँचिंग पॅडची अचूक छायाचित्रे उपलब्ध
पाकिस्तानात दहशतवादी अड्ड्यार अचूक हल्ले करण्याकरता इस्रोची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. इस्रोच्या उपग्रह जाळ्यांच्या इनपूटद्वारे प्राप्त मदतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानची सैन्यरडार सिस्टीम नष्ट करणे आणि पाकिस्तानच्या ड्रोन तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यांना निष्क्रीय करण्यास यश मिळविले आहे. इस्रोचे उपग्रहाचे जाळे भारतीय सैन्याला दहशतवाद्यांच्या अड्ड्याचा अचूक ठावठिकाणा, हल्ल्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यापासून पाकिस्तानचे सैन्यतळ, शस्त्रास्त्रसाठा, सैन्यतुकड्यांच्या हालचाली, रडारस्थानकांची माहिती पुरवत आहे. तसेच पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक हालचालींना ट्रॅक करण्यासारख्या प्रत्येक संवेदनशील कृत्याला जाणून घेत गुप्तचर माहिती प्राप्त करण्यास इस्रो सहाय्यभूत ठरत आहे. सद्यकाळात इस्रोच्या किमान 7 उपग्रहांद्वारे संवेदनशील आणि गुप्तचर माहिती मिळत आहे.
इस्रोच्या 7 टेहळणी उपग्रहांद्वारे सैन्याला अचूक इनपूट मिळत आहे. कार्टोसेटद्वारे 0.6 मीटर ते 0.35 मीटरपर्यंतची हाय रिझोल्युशन इमेजरी मिळू शकते. याच्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स, सैन्यतळांचा अचूक ठावठिकाणा आणि हालचालींची स्पष्ट छायाचित्रे मिळू शकली आहेत. या उपग्रहाद्वारे सीमावर्ती भागांमध्ये रियल टाइम छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिप्स देखील प्राप्त केल्या जाऊ शकतात.
आरआयसॅट-2बी (रडार इमेजिंग उपग्रह) : याच्या मदतीने ढग दाटलेले असताना, रात्रीच्या काळोखात आणि धूळयुक्त वादळादरम्यान देखील टेहळणी शक्य आहे, कारण यात सिंथेटिक अपर्चर रडार आधारित देखरेख होऊ शकते. भारतीय किनाऱ्यांना लागू असलेल्या भागात सागरीमार्गाने घुसू पाहणाऱ्या कुठल्याही जहाजाला ट्रॅक करण्याची क्षमता असलेला हा उपग्रह नौदलासाठी उपलब्ध आहे.
आरआयसॅट-2बीआर : सिंथेटिक अपर्चर रडार आधारित उपग्रह असून पाकिस्तानच्या गुप्त हालचालींची माहिती मिळवून देत लक्ष्यांची पुष्टी करून देण्यास सहाय्यभूत ठरला. केवळ 35 सेंटीमीटरच्या अंतरावरील दोन ऑब्जेक्ट्सची ओळख पटविण्याची क्षमता असलेला हा टेहळणी उपग्रह आहे.
कार्टोसॅट-3 : इंडिया रिमोट सेंसिंग प्रोग्रामचा हिस्सा आणि थर्मल इमेजिंगची क्षमता असलेला हा उपग्रह आहे. 25 सेंटीमीटर आकाराच्या वस्तूचे हाय रिझोल्युशन इमेज प्राप्त करणाऱ्या पॅनक्रॉमॅटिक कॅमेऱ्याने तो युक्त आहे.
इमिसॅट उपग्रह : डीआरडीओने कौटिल्य प्रकल्पाच्या अंतर्गत 8 वर्षांमध्ये विकसित केला. सीमापार शत्रूच्या रडारच्या इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सना पकडण्याची क्षमता, 90 मिनिटात पृथ्वीची प्रदक्षिणा हा उपग्रह पूर्ण करतो. इसिमॅटद्वारेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेन्स प्राप्त होऊ शकले. याच्याद्वारे पाकिस्तानचे रडार स्थानक, संचार सिग्नल्स आणि इलेक्ट्रॉनिक हालचालींना ट्रॅक केले जाऊ शकते. कुठे कोणती सैन्य उपकरणे सक्रीय केली जाते आहेत हे या उपग्रहाद्वारे कळू शकते. रडार सिस्टीम नष्ट करण्यास देखली याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
हायसिस उपग्रह : हायसिसद्वारे हायस्पॅक्ट्रल इमेजिंग प्राप्त होत आहे, म्हणजेच पाकिस्तानात कुठलाही स्ट्रक्चरल बदल किंवा सैनिक जमा होण्याच्या घटनेची माहिती प्राप्त होत आहे. पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रs अणि वाहनांच्या सामग्रीच्या आधारावर देखील ओळख पटविण्याची क्षमता आहे.
जीसॅट-7 (जियोस्टेशनरी सॅटेलाइट) : नौदल आणि तटरक्षक दलाच्या संचारासाठी उपलब्ध उगप्रह आहे. महासागर क्षेत्रात रियल टाइम कम्युनिकेशनची क्षमता, 60 जहाजे आणि 75 विमानांशी एकाचवेळी संचार करण्यास सक्षम, नौदलाच्या सर्व यंत्रणांना एकत्रित कनेक्ट करण्याची क्षमता यात आहे. याच्या माध्यमातून सैन्याचे कमांड आणि युनिट्सदरम्यान सुरक्षित संचार सुनिश्चित करण्यास मदत घेतली जात आहे. नौदल सागरी देखरेखीकरता याचा खासकरून वापर करत आहे. या उपग्रहाचा वापर वायुदल आणि भूल मानवरहित यान म्हणजेच ड्रोन्सचे संचालन आणि एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कमांड सिस्टीममध्ये केला जात आहे. पाकिस्तानकडून येणाऱ्या ऑब्जेक्टला ट्रॅक करण्यास याची मोठी मदत होत आहे.
जीसॅट-7ए (अँग्री बर्ड) : या उपग्रहाच्या एकूण क्षमतेचा 30 टक्के भारतीय सैन्य आणि वायुदलासाठी उपलब्ध आहे. या उपग्रहाने वायुदलाची लढाऊ विमाने, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम आणि ड्रोन्सला परस्परांशी आणि जमिनीवरील स्टेशन्सशी जोडण्याची क्षमता पुरवितो. यामुळे वायुदलाला नेटवर्क-केंद्रीत युद्धक्षमता प्राप्त झाली आहे.