For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाच्या विद्यार्थ्यांना इस्त्रोची वारी

05:32 PM Feb 01, 2025 IST | Radhika Patil
मनपाच्या विद्यार्थ्यांना इस्त्रोची वारी
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

महापालिकेच्या शाळेतील 21 विद्यार्थ्यांची बेंगालोर येथील इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. गतवर्षी राज्य व जिल्हा स्तरावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 56 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले. यापैकी 21 विद्यार्थ्यांची इस्त्रा sअभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. सोमवार दि. 10 ते 12 फेब्रुवारी असा तीन दिवसाचा अभ्यास दौरा होणार आहे.

विद्यार्थ्यांना इस्त्राsचे इस्ट्रक्ट, मोक्स व पीन्या हा औद्योगिक परिसर पाहण्याची संधी मिळणार आहे. इंस्ट्रक्ट या ठिकाणी ग्राउंड ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये सॅटेलाईट कडून येणारे मेसेज पृथ्वीपर्यंत कसे येतात. इथून सॅटेलाईट पर्यंत कमांड कशा जातात. इस्रोचे एखाद्या लेटेस्ट ऑपरेशन सुरू असेल तर त्याविषयीही लाईव्ह माहिती पाहायला मिळणार आहे. सॅटॅलाइट प्रक्षेपित करण्यासाठी वापरलेले इंजिन तसेच भारतीय बनावटीचे मॉडेल्स त्याबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू प्लेनोटेरियममध्ये थ्रीडी शो प्लेनोटेरियम पहावयास मिळणार आहे.

Advertisement

शिष्यवृत्तीमध्ये महापालिकेचे विद्यार्थी दरवर्षी चमक दाखवितात. यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान महापालिकेच्या शाळेने मिळवला आहे. दरवर्षी जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत डंका वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्यावतीनें आयोजन केले जाते. इस्त्राsकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत दोन शिक्षिका, एक अधिकारी व एक महिला डॉक्टर असणार आहेत. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या संकल्पनेद्वारे या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जाताना एक वेळचा विमान प्रवास व परतीचा रेल्वेने प्रवास करण्यात येणार आहे. तसेच बंगळुर येथे बसद्वारे पर्यटनाचे आयोजन केले आहे. यापुढेही महापालिकेमार्फत विद्यार्थ्यांसाठी असे विशेष उपक्रम राबवले जाणार असलेची माहिती उप आयुक्त साधना पाटील यांनी दिली.

  • तयारी स्पर्धा परीक्षांची

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने ‘तयारी स्पर्धा परीक्षांची’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थी आठवड्याला दिलेला अभ्यास करून स्पर्धा परीक्षांच्या धरतीवरील परीक्षा देऊन यश संपादन करीत आहेत. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी प्राथमिक स्तरापासूनच व्हावी, हा उद्देश समोर ठेवून सदर परीक्षांचे आयोजन केले जात आहे.

Advertisement
Tags :

.