लेबनॉनमधील युद्ध थांबविण्यास इस्रायलचा नकार
फ्रान्स-अमेरिकेचा युद्धविराम प्रस्ताव नेतान्याहू यांनी फेटाळला : संघर्ष चिघळण्याची चिन्हे
वृत्तसंस्था/जेऊसलेम / बैरुत
इस्रायल-लेबनॉन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि फ्रान्सने बुधवारी 21 दिवसांच्या युद्धबंदीची मागणी केली होती. मात्र युद्धविरामाचा हा प्रस्ताव इस्रायलने फेटाळून लावत अधिक जोरदारपणे हल्ले सुरूच ठेवण्याची सूचना सुरक्षा दलांना केली आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तसेच युद्धबंदीचे वृत्त चुकीचे असल्याचेही स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि फ्रान्सने युद्ध थांबवण्याची मागणी केली होती, असे नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. यावर नेतान्याहू यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये पूर्ण ताकदीने लढा देत राहील, असे सांगण्यात आले. याचदरम्यान, हिजबुल्लाहने इस्रायलच्या राफेल लष्करी केंद्रावर 45 रॉकेट डागले आहेत. यात किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
इस्रायलने लेबनॉनच्या युनिन भागात गुऊवारी हल्ला केला. यामध्ये 23 सीरियन नागरिकांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक कामानिमित्त लेबनॉनला गेले होते. याआधी बुधवारी इस्रायल-लेबनॉन युद्ध थांबवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये युद्धबंदीची मागणी करण्यात आली. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न चालवण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला. ऑस्ट्रेलिया, पॅनडा, सौदी अरेबिया, यूएई, कतारसह अनेक युरोपीय देशांनी युद्धबंदीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. या बैठकीत फ्रान्सने लेबनॉनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवणे आवश्यक आहे, अन्यथा मध्यपूर्वेतील युद्ध आणखी वाढू शकते, मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हे थांबवता येईल, असे म्हटले होते.
इस्रायल लेबनॉनमध्ये घुसखोरीच्या तयारीत
इस्रायल लेबनॉनमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे. लेबनॉनमध्ये त्यांच्या हवाई हल्ल्यांचा उद्देश हिजबुल्लाच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि जमिनीवर घुसखोरीचा मार्ग शोधणे हा आहे. इस्रायली फौजा हिजबुल्लाच्या हद्दीत घुसतील आणि त्यांच्या लष्करी चौक्मया उद्ध्वस्त करतील, असे इस्रायलचे लष्करप्रमुख हरजाई हलेवी यांनी सांगितले. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे इस्रायली लोकांना आपली घरे सोडावी लागली, असे ते म्हणाले.