For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलची लोकसंख्या पहिल्यांदाच कोटी पार

06:29 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलची लोकसंख्या पहिल्यांदाच कोटी पार
Advertisement

ज्यूधर्मीयांची संख्या 80 लाखापेक्षा कमीच :

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इस्रायलची लोकसंख्या पहिल्यांदाच 1 कोटीच्या पार झाली आहे. 1948 नंतर पहिल्यांदाच इस्रायलची लोकसंख्या 10.1 दशलक्ष झाली आहे. देशाच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्यूधर्मीय देशाच्या लोकसंख्येत 12 पट वाढ झाली आहे. इस्रायलच्या लोकसंख्या विभागानुसार मागील वर्षाच्या तुलनेत इस्रायलच्या लोकसंख्येत 1 लाख 35 हजार म्हणजेच 1.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. परंतु अद्याप ज्यूधर्मीयांची संख्या 80 लाख देखील झालेली नाही. इस्रायलचा शेजारी देश  पॅलेस्टाइन, लेबनॉन, सीरिया, इजिप्तसोबत संघर्ष झाला आहे. 1948 मध्ये देशाच्या स्थापनेपासूनच हा संघर्ष चालत आला आहे. अशा स्थितीत इस्रायलची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी असणे चर्चेचा विषय राहिला होता.

Advertisement

इस्रायलची लोकसंख्या आता 1 कोटीच्या आकड्यापर्यंत पोहोचली आहे, परंतु ज्यूधर्मीयांची संख्या 80 लाखाखाली आहे. आकडेवारीनुसार इस्रायलच्या लोकसंख्येत ज्यूंची संख्या सध्या 77.6 टक्के आहे. देशात 21. दशलक्ष म्हणजेच सुमारे 20 टक्के मुस्लीम, ख्रिश्चन आणि अरब आहेत. याचबरोबर अडीच लाख लोक कुठल्याही श्रेणीत मोडत नाहीत. यात विदेशी विद्यार्थी, कामगार आणि अवैध स्थलांतरित सामील आहेत. इस्रायलमध्ये मागील वर्षी 1 लाख 74 हजार मुलांचा जन्म झाला, याचबरोबर 28 हजार लोक अन्य देशांमधून येत येथे स्थायिक झाले, तर 50 हजार इस्रायलींचा एक वर्षात मृत्यू झाला आहे.

ज्यू राष्ट्रासाठी दिलाशाची बाब म्हणजे तेथील युवा लोकसंख्येचे प्रमाण चांगले आहे. 27 टक्के इस्रायली नागरिक हे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. याचबरोबर 13 टक्के लोकांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. इस्रायलची लोकसंख्या अधिक नाही, परंतु त्यात वाढ झाल्याने ज्यू राष्ट्राला दिलासा मिळाला आहे. इस्रायल सोडून अन्य देशांमध्ये जाणाऱ्या लोकांच्या संख्येतही घसरण झाली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 56 हजार इस्रायलीच दुसऱ्या देशांमध्ये राहत आहेत. मागील काही वर्षांमध्ये अन्य देशांमध्ये स्थायिक होणाऱ्या इस्रायलींची संख्या वेगाने कमी झाली आहे, म्हणजेच इस्रायलचे नागरिक आता कमाईसाठी अन्य देशांमध्ये जाणे पसंत करत नाहीत.

Advertisement
Tags :

.