इस्रायलचे फोर्स सायरेत मतकल
इराणमध्ये शिरून पार पाडले मोठे अभियान
इराणमधून अमेरिकेच्या वैमानिकाला सुखरुप बाहेर काढण्याच्या अभियानात इस्रायलच्या सैन्याचाही मोठा हात आहे. इस्रायलच्या दोन फोर्सेसनी (सायरेत मतकल आणि शालदाग) बचाव अभियानात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने एफ-15ई आणि ए-10 ला नष्ट केले होते. इराणच्या हल्ल्यात एफ-15ईच्या दोन वैमानिकांपैकी एकाला अमेरिकेच्या स्पेशल फोर्सने सुरक्षित बाहेर काढले होते, तर एक जण बेपत्ता होता. त्याला इराणबाहेर काढण्यासाठी मोठे अभियान हाती घेण्यात आले होते.
अमेरिकेच्या सैन्याने स्वत:च्या वैमानिकाला सुरक्षित आणण्यासाठी अभियान राबविले, ज्यात इस्रायलच्या दोन कमांडो युनिट सायरेत मतकल आणि शालदागने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. या फोर्सेसच्या कमांडोंनी ग्राउंड ऑपरेशन राबविले. इस्रायलच्या या दोन्ही फोर्स अत्यंत धोकादायक अन् शक्तिशाली आहेत.
काय आहे सायरेत मतकल?
सायरेत मतकल हे इस्रायल डिफेन्स फोर्सचे एक स्पेशल आणि प्रमुख फोर्स युनिट आहे. याची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती. यात सामील होण्यासाठी कमांडोंनी अत्यंत कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. याच्या स्थापनेचा उद्देश शत्रूच्या भागात शिरणे, गुप्तचर माहिती जमविणे आणि ओलिसांना शत्रूच्या तावडीतून मुक्त करविण्यासोबत दहशतवाद विरोधातील अभियानांचा आहे. हे फोर्स शत्रूच्या सीमेत शिरून, जमीन, हवा किंवा समुद्रमार्गे हल्ला करण्यास तरबेज मानले जाते.
‘सिक्रेट ऑपरेशन’मध्ये वापर
इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या सर्वोच्च कमांडरला जनरल स्टाफ किंवा मतकल म्हटले जाते. तर शत्रूंचा शोध लावण्यात तरबेज विशेष दलाच्या तुकड्यांना ‘सायरेत’ म्हटले जाते. याचमुळे सायरेत मतकल हे नाव पडले आहे. ही तुकडे थेट जनरल स्टाफला उत्तरदायी आहे. सिक्रेट ऑपरेशनला मूर्त रुप देणाऱ्या सायरेत मतकलला ‘युनिट 269’ नावानेही ओळखले जाते.
कशी झाली होती स्थापना?
इस्रायलच्या या धोकादायक आणि शक्तिशाली विशेष दलाच्या स्थापनेची कहाणीही रंजक आहे. 1948 मध्ये उदयास आलेला इस्रायल स्थापनेपासूनच बर्हिगत धोक्यांना सामोरा जातोय. प्रारंभी गुरिल्ला युद्धाद्वारे शत्रू इस्रायली लोकांना ओलीस ठेवत होते. या आव्हानांना तोंड देण्यासाठीच 1957 मध्ये एक स्पेशल कमांडो युनिट निर्माण करण्याची सूचना तत्कालीन आयडीएफ जनरलने दिली होती. यानंतरच या युनिटची स्थापना करण्यात आली होती.