For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेहरानवर इस्रायलचा भीषण बॉम्बवर्षाव

06:22 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेहरानवर इस्रायलचा भीषण बॉम्बवर्षाव
Advertisement

13 जणांचा मृत्यू : शरीफ विद्यापीठावरही हवाई हल्ला

Advertisement

इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहर येथे सोमवारी पहाटे इस्रायलने हवाई हल्ले पेले आहेत. या हल्ल्यांमध्ये कमीतकमी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर परिसरात विध्वंसाचे दृश्य दिसून येत आहे. अनेक लोक इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडल्याची भीती व्यक्त होतेय. अनेक जण गंभीर जखमी असल्याने आणि काही जण ढिगाऱ्याखाली अडकून असल्याने मृतांची संख्या वाढू शकते असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

विद्यापीठही लक्ष्य

Advertisement

तेहरान येथील शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीलाही इस्रायलने लक्ष्य केले. या हल्ल्यात विद्यापीठाच्या काही इमारतींचे नुकसान झाले आहे, तसेच नजीकचे गॅस वितरण केंद्रही प्रभावित झाले आहे. परंतु विद्यापीठ परिसराच्या आत खरे लक्ष्य काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. युद्धामुळे इराणमधील शैक्षणिक संस्था बंद असून सर्व वर्ग ऑनलाइन सुरू आहेत, ज्यामुळे परिसर रिकामाच होता.  अनेक तासांपर्यंत आकाशात लढाऊ विमाने घोंगावत राहिल्याने स्थानिक लोकांमध्ये दहशतीचे वातावरण होते.  या विद्यापीठावर यापूर्वीच अनेक देशांनी निर्बंध लादले आहेत. कारण याचे नाव इराणचा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि सैन्य संशोधनाशी जोडले जात राहिले आहे. हा कार्यक्रम मुख्यत्वे इराणच्या आयआरजीसीच्या नियंत्रणात आहे.

इस्रायल-युएईकडून अलर्ट जारी

तर दुसरीकडे इस्रायलमध्ये सुरक्षा यंत्रणांनी एक क्षेपणास्त्र अलर्ट जारी केला. तर युएईच्या दुबईमध्येही दोनवेळा अलर्ट देण्यात आला. तेथे हवाई सुरक्षा प्रणाली सक्रीय झाली, पण इराणकडून कुठल्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले होते हे स्पष्ट नाही. कुवैतनेही रविवारी रात्रभर स्वत:च्या हवाई सुरक्षा प्रणालीचा वापर करत संभाव्य धोक्यांना रोखले आहे.

कोम येथे हल्ला, 5 जण ठार

इराणचे धार्मिक शहर कोम येथे झालेल्या हवाई हल्ल्यात कमीतकमी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोम हे तेहरानच्या दक्षिण दिशेला असलेले एक प्रमुख शिया धार्मिक केंद्र आहे. परंतु या हवाई हल्ल्याचे खरे लक्ष्य काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इराणने मागील काही दिवसांपासून युद्धात झालेल्या हानीचे आकडे जाहीर केलेले नाहीत.

Advertisement
Tags :

.