इस्रायलच्या मंत्रिमंडळाला करार मान्य
वृत्तसंस्था / जेरुसलेम
इस्रालय आणि हमास यांच्यात गाझा पट्टीतील शांततेशाठी झालेल्या कराराला इस्रायलच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या करारावर शुक्रवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे आता या कराराचे क्रियान्वयन आज रविवारपासून केले जाणार आहे. त्यामुळे या भागात शांतता नांदेल अशी अपेक्षा केली जात आहे.
या करारानुसार हमासने पकडलेले काही ओलीस सोडले जाणार आहेत. त्याच्या मोबदल्यात इस्रायलकडुन हमासच्या 787 कैद्यांची सुटका केली जाणार आहे. रविवारी दुपारी चारच्या नंतर ही अदलाबदली होईल, अशी शक्यता आहे. मात्र, अद्यापही हमासविषयी इस्रायलने शंका व्यक्त केली असून ओलीस ठेवलेले नागरीक परत मिळाल्याशिवाय कैद्यांची सुटका केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्रवारी हा करार झाल्यानंतर शनिवारी इस्रायलने हमासवर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात किमान 50 लोक मारले गेले होते.
युद्धाची उद्दिष्ट्यो पूर्ण
हमासशी ज्या कारणांमुळे युद्ध छेडण्यात आले होते, ती उद्दिष्ट्यो आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शांतता कराराला आम्ही सहमती दिली. या कराराच्या अटींचे पालन हमासकडून झाले नाही, तर इस्रायलही शांतता राखण्याची हमी देत नाही. त्यामुळे आता हमासवर मोठी जबाबदारी आहे, असे इस्रायली सूत्रांचे म्हणणे आहे.