For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले सुरुच

06:37 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले सुरुच
Advertisement

वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisement

इस्रायलने गाझा पट्टीतील आपले हल्ले सुरुच ठेवले असून हमासचा नायनाट करण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. आता इस्रायलच्या सेनेने उत्तर गाझाप्रमाणे दक्षिण गाझावरही आपले लक्ष केंद्रीत केले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा हल्ले सुरु झाले आहेत.

जगभरात हमासचे दहशतवादी आणि म्होरके कोठेही असले तरी त्यांचा नायनाट करण्याचे उत्तरदायित्व इस्रायलने आपली गुप्तहेर संस्था मोसादवर सोपविले आहे. हमासचे म्होरके कतारमध्ये दडलेले असले तरी त्यांना शोधून ठार करा, असा आदेशच मोसादला देण्यात आल्याचे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे यापुढच्या काळात गाझा पट्टी आणि वेस्ट बँक प्रमाणेच जगभरात कोठेही हमासचे अस्तित्व असले तरी इस्रायलची गुप्तहेर संस्था तेथे पोहचेल अशी शक्यता आहे.

Advertisement

200 हून अधिक ठार

शस्त्रसंधी संपल्यानंतर इस्रायलने केलेल्या वायू हल्ल्यांमध्ये हमासची अनेक स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. हमासची किमान 200 केंद्रे नष्ट करण्यात आली असून अग्निबाण डागण्याची केंद्रेही उडविण्यात आली आहेत. या कारवाईत 200 हून अधिक नागरिक ठार झाल्याचा दावा हमासकडून करण्यात आला. इस्रायलने तो नाकारला असून केवळ हमासच्या केंद्रांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट केले. गाझापट्टी प्रमाणेच वेस्ट बँकमधील हमासच्या स्थानांनाही लक्ष्य बनविण्यात आले आहे. वेस्ट बँकमध्ये इस्रायलने आतापर्यंत 880 हून अधिक हमास हस्तकांना अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.