भीषण! गाझामधील UN च्या शाळेवर इस्रायलचा हल्ला, ३० जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक जखमी
इस्रायलने गाझामधील युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या अबू हुसेन स्कूलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायल आणि हमास दरम्यान गाझा पट्टीत चार दिवस युद्ध विराम आणि हमासद्वारे बंदी बनवण्यात आलेल्या लोकांच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात कैद पॅलेस्टाईन नागरिकांना मुक्त करण्याच्या करार अखेरच्या क्षणी थांबवण्यात आला. इस्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घोषणा केली की, हा करार शुक्रवारपूर्वी लागू होणार नाही. यापूर्वी गुरुवारपासून हा करार लागू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान पॅलेस्टाईन डॉक्टरने गुरुवारी दावा केला की, गाझामध्ये संयुक्त राष्ट्र मदत व बचाव कार्य एजन्सी (UNRWA) कडून चालवल्या जाणाऱ्या अबू हुसैन शाळेवर इस्रायलने हल्ला केला.
अल-जजीराच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर हजारो पॅलेस्टिनी जबलिया कॅम्पमधून पळून गेले. यावेळी इस्रायली लष्कराने कॅम्पमध्ये असलेल्या शाळेला लक्ष्य केले आहे. याशिवाय उत्तर गाझा येथील इंडोनेशियाई रुग्णालयावरही इस्रायलीने हल्ला केला आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-कुद्रा यांनी सांगितलं की, "रुग्णालयावर बॉम्बफेक करण्यात आली असून शाळेला लक्ष्य करण्यात आलं आहे.