For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लेबनॉनमध्ये इस्रायलचा ड्रोन हल्ला

06:22 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
लेबनॉनमध्ये इस्रायलचा ड्रोन हल्ला
Advertisement

निशस्त्राrकरण बैठकीपूर्वी हिजबुल्ला विरोधात कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इस्रायलच्या वायुदलाने मंगळवारी पहाटे दक्षिण आणि पूर्व लेबनॉनच्या अनेक भागांवर हवाई हल्ला केला आहे. देशातील तिसरे सर्वात मोठे शहर सिदोनलाही इस्रायलने लक्ष्य केले. मंगळवारी पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यात सिदोन शहरातील तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे.

Advertisement

लेबनॉनच्या सैन्य कमांडरकडून इस्रायलसोबत सीमावर्ती क्षेत्रांमध्ये दहशतवादी संघटना हिजबुल्लाला निशस्त्र करण्याच्या स्वत:च्या मिशनबद्दल सरकारला माहिती देण्याच्या काही दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. इस्रायलच्या या कारवाईमुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. तर इस्रायलच्या सैन्याने सोमवारी दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले होते. या ठिकाणांवर हिजबुल्लाह आणि हमास यासारख्या दहशतवादी संघटनांकडून शस्त्रास्त्रs लपविली जात असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने हवाई हल्ल्यापूर्वी लेबनॉनच्या या भागातील नागरिकांना इशारा दिला होता.

बेका खोऱ्यातील मनारा गावात ज्या घरावर हल्ला झाला, ते हमासचा सैन्य कमांडर शरहाबिल अल-सैयदचे होते. तो मे 2024 मध्ये एका इस्रायली ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर संबंधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. दक्षिण लेबनॉनमधील ब्राईकेह गावात एका कारवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या दोन सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलने सांगितले आहे.

लेबनॉनच्या सैन्याने मागील वर्षी पॅलेस्टिनी समुहांच्या निशस्त्राrकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. तर 2025 च्या अखेरपर्यंत इस्रायलच्या सीमेला लागून असलेलया सर्व क्षेत्रामधून हिजबुल्लाहची सशस्त्र उपस्थिती हटविली जाणार असल्याचे सरकारने म्हटले होते.

Advertisement
Tags :

.