For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेजसमध्ये वापरला जाणार इस्रायली कंपनीचा रडार

06:38 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
तेजसमध्ये वापरला जाणार इस्रायली कंपनीचा रडार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाची क्षमता जगाने पाहिली होती. परंतु आता हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) मेक इन इंडियाला बाजूला ठेवत इस्रायलच्या कंपनीकडून रडार खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि डीआरडीओच्या उत्तम रडारला नाकारले. एचएएलने स्वत:च्या  लढाऊ विमानांमध्ये डीआरडीओकडून विकसित करण्यात आलेला स्वदेशी ‘उत्तम एईएसए रडार’, स्वयं रक्षा कचव (एसआरके) आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीम (ईडब्ल्यू) ऐवजी इस्रायली कंपनी इल्टा सिस्टीम्सकडून रडार अन् ईडब्ल्यू सिस्टीम खरेदी करण्याचा  निर्णय घेतला आहे. एचएएलने  इस्रायली सिस्टीमची निवड केल्याने वाद उभा ठाकला आहे.

एचएएलने इस्रायली कंपनी इल्टाला औपचारिक लेटर ऑफ इन्टेंट पाठविले आहे. भारत स्वत:च्या प्रत्येक संरक्षण करारांमध्ये मेक इन इंडियाला सामील करत स्वदेशी संरक्षण उद्योगाचा वेगाने विकास घडवू पाहत असताना एचएएलचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. एचएएलने प्रथम डीआरडीओकडून या स्वदेशी प्रणालींच्या खरेदीची तयारी दर्शविली होती परंतु आता नकार दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.