कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

येमेनच्या शहरावर इस्रायलचा एअरस्ट्राइक

06:13 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हुती बंडखोरांच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला चोख प्रत्युत्तर : 50 ठिकाणी पाडविले बॉम्ब

Advertisement

वृत्तसंस्था/ सना

Advertisement

इस्रायलच्या सैन्याने येमेनमध्ये हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखालील बंदर शहर हुदैदाहवर सोमवारी रात्री भीषण बॉम्बवर्षाव केला आहे. सैन्यानुसार या कारवाईत इस्रायलच्या 20 लढाऊ विमानांनी भाग घेतला, याकरता विमानांनी 2 हजार किलोमीटरचे अंतर कापले होते. हल्ल्यात हुदैदाह बंदर आणि बाजिल काँक्रिट फॅक्ट्रीला लक्ष्य करण्यात आले. इस्रायल डिफेन्स फोर्सनुसार लढाऊ विमानांनी कमीतकमी 50 लक्ष्यांवर बॉम्ब पाडविले आहेत.

हुती बंडखोरांनी रविवारी इस्रायलच्या तेल अवीव येथील बेन गुरियन विमानतळावर हल्ला केला होती. हुतींच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. यानंतर इस्रायलने याचा सूड उगविणार असल्याची घोषणा केली होती.

तर इस्रायलने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये किमान 21 जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या या हल्ल्याला आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. इस्रायलचे हल्ले आम्हाला रोखू शकणार नाहीत. हा हल्ला इस्रायल आणि अमेरिका दोन्ही देशांनी मिळून केला होता असा दावा हुती बंडखोरांच्या माध्यम विभागाचे प्रमुख नसरुद्दीन आमेरने केला. तर अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने या कारवाईत अमेरिकेचा सहभाग नव्हता असे स्पष्टीकरण दिले आहे.

हुती शासनाची अर्थव्यवस्था आणि त्याच्या सैन्य निर्मितीसाठी एक झटका आहे. बाजिल काँक्रिट फॅक्ट्री हुतींसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक स्रोत म्हणून काम करते आणि याचा वापर भुयारं आणि सैन्य प्रकल्पांच्या निर्मितीसाठी केला जातो. हुदैदाह बंदराचा वापर हुती दहशतवादी इराणी शस्त्रास्त्रs, उपकरणे प्राप्त करण्यासाठी करत होते असा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलने येमेनसोबत सोमवारी रात्री सीरिया, लेबनॉन आणि गाझावरही हल्ले केले आहेत. आयडीएफने दक्षिण लेबनॉन आणि बेका खोऱ्यात हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर अनेक हवाई हल्ले केले आहेत. लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या सीरियावरही हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलच्या सैन्याने गाझावर केलेल्या हल्ल्यात 54 जणांना जीव गमवावा लागला आहे.

गाझावर पूर्ण कब्जा करणार इस्रायल

याचदरम्यान इस्रायलने गाझामध्ये सैन्य अभियान आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. इस्रायलच्या वॉर कॅबिनेटने सोमवारी या निर्णयाला मंजुरी दिली. यात गाझावर पूर्णपणे कब्जा करणे आणि पूर्ण भागावर नियंत्रण मिळविण्याची योजना सामील आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतरच ही योजना लागू केली जाणार आहे. इस्रायल तोपर्यंत हमाससोबत शस्त्रसंधी आणि ओलिसांच्या मुक्ततेकरता करारावर सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न जारी ठेवणार आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article