For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येमेनवर इस्रायलकडून एअरस्ट्राइक

06:09 AM Dec 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
येमेनवर इस्रायलकडून एअरस्ट्राइक
Advertisement

इस्रायलकडून हुती बंडखोरांच्या विरोधात धडक कारवाई  : 25 हून अधिक लढाऊ विमानांचा सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था/ सना

इस्रायलच्या सैन्याने आता लाल समुद्रात स्वत:चा सर्वात मोठा शत्रू  असलेल्या हुती बंडखोरांना लक्ष्य केले आहे. इस्रायलच्या सैन्याने येमेनमध्ये हुती बंडखोरांशी निगडित अनेक ठिकाणांवर हल्ले केले असून यात सना येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पश्चिम किनाऱ्यावरील तीन बंदरे सामील आहेत. इस्रायलच्या वायुदलाने येमेनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे विमानतळाचा कंट्रोल टॉवर निष्क्रीय झाला असून हुती प्रशासनाकडून वापरण्यात येणारी नागरी विमाने देखील नष्ट झाली आहेत.

Advertisement

हा एअरस्ट्राइक युद्धस्तराचा होता, ज्यात इस्रायलने मोठ्या संख्येत लढाऊ विमानांचा वापर केला. या कारवाईत 100 हून अधिक विमानांनी भाग घेतला असून ही मोहीम अमेरिकेसोबत समन्वय राखत पार पाडण्यात आली आहे. हूती मोठी किंमत मोजतील आणि आमचे सामर्थ्य अनुभवतील, असे आम्ही म्हटले होते. हा हल्ला अखेरचा नसेल असे इस्रायलच्या नेतृत्वाने नमूद केले आहे.

नेतान्याहूंकडून हूतींना धमकी

इस्रायलच्या हल्ल्यामुळे येमेनमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. आम्ही इराणच्या दहशतवादाचे हात कापून टाकण्यासाठी दृढ आहोत. हमास, हिजबुल्ला, असाद सरकार आणि अन्य लोकांनी शिकलेला धडा हूती देखील शिकतील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. जो इस्रायलला नुकसान पोहोचवेल, त्याचा पाठलाग केला जाणार आहे. कुठलाही हुती नेता इस्रायलच्या तावडीतून सुटणार नाही, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्ज यांनी इशारावजा वक्तव्य केले आहे.

इस्रायलने वाढविली सुरक्षा

इस्रायलच्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकांची त्यांना साथ मिळाल्याचे हिजबुल्लाहशी संबंधित लेबनॉनमधील अल मयादीन या प्रसारमाध्यमाने म्हटले आहे. तर येमेनमधील हल्ल्यानंतर हुतींकडून प्रत्युत्तरादाखल पाऊल उचलले जाण्याची शक्यता पाहता इस्रायलने स्वत:च्या हवाई सुरक्षेचा स्तर वाढविला आहे.

तेल अवीववरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा सूड

तेल अवीव शहरावर हुती बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलने एअरस्ट्राइकद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. येमेनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र तेल अवीवच्या एका उद्यानात कोसळले होते. यात इस्रायलचे अनेक नागरिक जखमी झाले होते. हुती बंडखोरांनी हायपरसोनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले होते.

डब्ल्यूएचओ प्रमुख बचावले

इस्रायलच्या सना येथील एअर स्ट्राइकदरम्यान डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडेहोनम बचावले आहेत. टेड्रोस हे सना विमानतळावरून रवाना होणार असतानाचा इस्रायलकडून एअरस्ट्राइक करण्यात आला होता. या हल्ल्यात टेड्रोस यांच्या पथकातील एक सदस्य जखमी झाला आहे.  टेड्रोस यांना या हल्ल्यामुळे सना येथील मुक्काम वाढवावा लागला. इस्रायलच्या हल्ल्यात धावपट्टीचे नुकसान झाल्याने त्यांचे विमान तूर्तास उ•ाण करू शकणार नसल्याचे समजते.

सना, हुदैदाह उद्ध्वस्त

इस्रायलने स्वत:च्या हल्ल्यांद्वारे येमेनची राजधानी सना आणि बंदर शहर हुदैदाहला लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये हुती बंडखोरांचे अनेक तळ नष्ट झाले असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील झाली आहे. सना आंतरराष्ट्रीय विमानतळ, हेजयाज, रस कानेतीब ऊर्जा केंद्र, अल हुदैदाह, सलीफ आणि रस कानेतीब बंदराला इस्रायलने लक्ष्य केले आहे.

Advertisement
Tags :

.