गाझामध्ये हमासवर हल्ले करत राहणार इस्रायल
तेल अवीव :
गाझामध्ये 10 ऑक्टोबर रोजी लागू झालेल्या युद्धविरामाने दोन वर्षांपासून होत असलेली हिंसा रोखली परंतु हा करार अत्यंत नाजूक सिद्ध होतोय आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने लागू या करारात मानवीय सहाय्य वाढविणे आणि राफा सीमा पुन्हा खुली करण्याची तरतूद होती. परंतु हमास आणि इस्रायल परस्परांवर या युद्धविराम कराराच्या उल्लंघनाचे आरोप करत आहेत. रविवारी हमासने राफामध्ये इस्रायलच्या सैनिकांवर हल्ला केला, या हल्ल्यात इस्रायलचे दोन सैनिक मृत्युमुखी पडले हेते. याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने गाझावर हवाई हल्ले केले, ज्यात कमीतकमी 26 पॅलेस्टिनी मारले गेले. तर दुसरीकडे इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ल्यांची तीव्रता वाढविली आहे. लेबनॉनसोबत युद्धविराम असला तरीही इस्रायल जवळपास दररोज हवाई हल्ले करतोय. हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य करत असल्याचे इस्रायलचे सांगणे आहे. गाझामध्येही हा पॅटर्न राबविला जाईल, म्हणजेच युद्धविरामानंतरही इस्रायलकडून निरंतर हल्ले सुरू राहतील असा तज्ञांचा अनुमान आहे. गाझा युद्धविराम लागू झाला असला तरीही तेथे कमी तीव्रतेचा संघर्ष कायम राहू शकतो.
लेबनॉनचा अनुभव गाझासाठी एक धडा ठरू शकतो. लेबनॉन इस्रायलच्या सैन्याला पूर्ण युद्धाशिवाय, संभाव्य धोक्यावर हल्ला करण्याची सूट देतो. आमचे हल्ले हिजबुल्लाहचे तळ आणि शस्त्रास्त्रसाठ्यांना लक्ष्य करणारे असल्याचे इस्रायलचे सांगणे आहे.
हिजबुल्लाहला पुन्हा उभे राहण्यापासू रोखणे हा यामागील उद्देश असल्याचे इस्रायल सांगत आहे. तर लेबनॉनचे अधिकारी याला हिजबुल्लाहच्या निशस्त्राrकरणाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा ठरवत आहेत. लेबनॉनने याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत तक्रारही नेंदविली आहे.