For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाझामध्ये नव्या संघटनेला इस्रायलचे समर्थन

06:38 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
गाझामध्ये नव्या संघटनेला इस्रायलचे समर्थन
Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

Advertisement

गाझामध्ये हमासचा सामना करण्यासाठी इस्रायलने एका पॅलेस्टिनी उग्रवाद्यांना शस्त्रास्त्रs पुरविल्याचा आरोप होत आहे. गाझामध्ये हमाचा मागील 2 दशकांपासून कब्जा आहे. अनेक प्रयत्न करूनही इस्रायलला हमासचा पूर्णपणे खात्मा करता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर इस्रायलने आता गाझामधून हमासचे अस्तित्व संपविण्याची जबाबदारी ‘पॉप्युलर फोर्सेस’ला दिली आहे. या संघटनेचा नेता यासर अबू शबाब आहे. अबू शबाब स्वत:ला ‘दहशतवादाचे उच्चाटन करणारा’ संबोधून घेतो, परंतु अनेक मानवाधिकार संघटना त्याला लुटारू आणि गुन्हेगारांचा म्होरक्या मानतात.

गाझामध्ये हमासला कमकुवत करण्यासाठी त्याच्या विरोधी संघटनांना समर्थन दिल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी मान्य केले आहे. यामुळे इस्रायली सैनिकांचा जीव वाचत असेल तर यात चुकीचे काय असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

Advertisement

हमासच्या कैदेत होता अबू शबाब

अबू शबाब एकेकाळी गुन्हेगारीत लिप्त होता, काही वर्षांपूर्वी हमासच्या पोलिसांना त्याला चोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी तुरुंगात डांबले होते. 2023 च्या अखेरीस इस्रायल आणि हमास संघर्ष सुरू झाल्यावर तो तुरुंगातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने स्वत:ची एक सशस्त्र संघटना ‘पॉप्युलर फोर्सेस मिलिशिया’ निर्माण केली. यात 100 हून अधिक सदस्य आहेत. हे सदस्य पॅलेस्टिनी ध्वज आणि ‘काउंटर-टेररिजम युनिट’चा पॅच असलेला गणवेश परिधान करतात.

शिन बेटचे प्लॅनिंग

पॉप्युलर फोर्सेस इस्रायलच्या सैन्याचे नियंत्रण असलेल्या भागांमध्ये सक्रीय आहे. हमासकडून जप्त शस्त्रास्त्रs इस्रायलने या संघटनेला पुरविली आहेत. तर हमास विरोधात नवी संघटना उभी करण्याची योजना इस्रायलची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा शिन बेटने आखली असून याला पंतप्रधान नेतान्याहू तसेच त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. हमासला कमकुवत करत इस्रायली सैनिकांचा जीव वाचविण्यासाठी ही रणनीति स्वीकारण्यात आल्याचा इस्रायलच्या सरकारचा युक्तिवाद आहे.

मदतसामग्री लुटल्याचा आरोप

गाझामध्ये सध्या स्थिती अत्यंत खराब असताना लोकांपर्यंत मदतसामग्री पोहोचविणारे ट्रक लुटल्याचा आरोप अबू शबाबवर होत आहे. त्याचा गट आटा, औषधे आणि अन्य आवश्यक सामग्री शस्त्रांच्या बळावर लुटत असल्याचे बोलले जातेय. तसेच ही लूट इस्रायलच्या देखरेखीत होतेय असा दावा संयुक्त राष्ट्रसंघच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. गाझामधील ट्रकचालक आणि त्यांच्या युनियन्स देखील अबू शबाबबद्दल घाबरुन आहेत. अलिकडेच ट्रकचालकांवर गोळीबार झाला असता युनियनने काम रोखले होते. परंतु अबू शबाबने हे आरोप फेटाळले आहे.

हमासकडून लक्ष्य

आमची संघटना रफाहमध्ये स्थानिक लोकांना सुरक्षा पुरविते आणि हमासच्या दहशतीपासून त्यांना वाचवत असल्याचा अबू शबाबचा दावा आहे. तर हमासने अबू शबाबला इस्रायलचा सहकारी संबोधिले आहे. हमासने मागील वर्षी अबू शबाबच्या संघटनेच्या विरोधात अनेक हल्ले केले. यात अबू शबाबच्या भावासमवेत 20 जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :

.