For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जॉर्डनच्या माजी सैनिकामुळे हादरला इस्रायल

06:16 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
जॉर्डनच्या माजी सैनिकामुळे हादरला इस्रायल
Advertisement

गोळीबारात 3 जण ठार : अनेक सीमांना केले सील

Advertisement

वृत्तसंस्था/ अम्मान

वेस्ट बँक आणि जॉर्डनच्या मध्य बॉर्डर क्रॉसिंगवर तीन इस्रायली नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. एक बंदूकधारी इसम जॉर्डनमधून आलेल्या ट्रकमधून एलेनबी ब्रिज क्रॉसिंगनजीक पोहोचला आणि त्याने इस्रायली नागरिकांवर गोळीबार केला आहे. तर प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत इस्रायलच्या सुरक्षा दलांनी त्याला कंठस्नान घातले आहे.

Advertisement

हल्लेखोर जॉर्डनचा नागरिक होता. त्याचे नाव माहेर अल-जाजी असून तो जॉर्डनचा निवृत्त सैनिक होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. तसेच त्यांनी या हल्ल्याला इराण आणि त्याच्या सहकारी दहशतवादी समुहांसोबतच्या इस्रायलच्या संघर्षाशी जोडले आहे.

किंग हुसैन ब्रिजनजीक झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या प्रारंभिक तपासात शूटर जॉर्डनचा नागरिक असल्याचे समोर आले आहे. ही घटना एक वैयक्तिक  कृत्य असल्याचे संकेत तपासात मिळाले आहेत.  परंतु अद्याप तपास सुरू असल्याचे जॉर्डनच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे. जॉर्डनने 1994 मध्ये इस्रायलसोबत शांतता करार केला होता.

शूटरने जॉर्डनमधून वेस्ट बँकेत मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक म्हणून पूल ओलांडला आणि गोळीबार केला आहे. त्याचा मृतदेह परत मिळविण्यासाठी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान चर्चा सुरू असल्याचे जॉर्डनच्या गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

इस्रायलच्या प्राधिकरणाने एलेनबी ब्रिज बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या पूलाला जॉर्डनमध्ये किंग हुसैन ब्रिज या नावाने ओळखले जाते. याचबरोबर इस्रायलने ईलाट आणि जॉर्डनच्या अकाबादरम्यान वादी अरब क्रॉसिंग आणि बेत शीआन आणि जॉडर्नच्या इरबिद दरम्यान जॉर्डन नदी क्रॉसिंगलाही बंद केले आहे.

Advertisement
Tags :

.