इस्रायलचा मध्य गाझामधील रुग्णालयावर क्षेपणास्त्रांचा मारा
जेरुसलेम :
इस्रायलने मध्य गाझामध्ये शनिवारी रात्री उशिरा हवाई हल्ले केले. स्थानिक रुग्णालयावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. दोन क्षेपणास्त्रs कॉम्प्लेक्समधील एका इमारतीवर पडल्याचे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात आपत्कालीन आणि स्वागत विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच जवळच्या इमारतींचेही नुकसान झाले. हल्ला करण्यापूर्वी काही वेळ आधी एक फोन आला होता. यामध्ये त्यांना इमारत तात्काळ रिकामी करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच हल्ला झाला. या हल्ल्याबाबत इस्रायली सैन्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. इस्रायली लष्कराने रफाहला गाझाच्या उर्वरित भागापासून तोडले आहे. संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी याची पुष्टी केली आहे. इस्रायली संरक्षण दलाने मोराग कॉरिडॉर ताब्यात घेतल्यामुळे रफाह गाझा पट्टीपासून तुटला आहे.