युएन रिलीफ एजेन्सीवर इस्रायलकडून बंदी
संस्थेचे कर्मचारी हमासचे हस्तक असल्याचा आरोप : पॅलेस्टिनी शरणार्थींसमोर संकट
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलच्या संसदेने (नेसेट) संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजेन्सीवर (युएनआरडब्ल्यूए) बंदी घालण्याची तरतूद असलेला प्रस्ताव संमत केला आहे. आता या एजेन्सीला इस्रायलच्या भूमीवर कार्य करता येणार नाही. हा प्रस्ताव 92 विरुद्ध 10 मतांनी संमत झाला आहे.
गाझा, वेस्ट बँक आणि इस्रायलच्या उर्वरित भागांमध्ये लोकांना कथित स्वरुपात मदत करत असलेल्या युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजेन्सी फॉर पॅलेस्टाइन रिफ्यूजीजला 3 महिन्याच्या आत काम रोखावे लागणार आहे. युएनआरडब्ल्यूए इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँक समवेत गाझामध्ये लाखो पॅलेस्टिनी शरणार्थींना शिक्षण, आरोग्य सेवा आणि अन्य मूलभूत गोष्टी पुरविते. ही एजेन्सी गाझा आणि वेस्ट बँकेत 25 लाख लोकांना मदत करत आहे.
इस्रायलच्या संसदेत कायदा संमत झाल्याने गाझामध्ये मानवी संकट चिघळण्याची शक्यता वाढली आहे, कारण तेथे यापूर्वीच अन्न, पाणी आणि औषधांची कमतरता आहे. तर युएनआरडब्ल्यूएचे कर्मचारी हे हमासचे हस्तक असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे.
दहशतवादी संघटना घोषित
नेसेटमध्ये आणखी एका विधेयकावर मतदान झाले आहे. युएनआरडब्ल्यूएला आता दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांना या एजेन्सीसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क राखण्यास बंदी मनाई करण्यात आला आहे. 1967 मध्ये इस्रायल आणि संयुक्त राष्ट्रसंघात करार झाला होता. यानुसार युएनआरडब्ल्यूएला इस्रायलच्या कब्जातील भूभागात पॅलेस्टिनी शरणार्थींना मदत करण्याची अनुमती मिळाली होती. परंतु आता करार आता रद्द झाला आहे.
हमास अन् युएनआरडब्ल्यूएची हातमिळवणी
युएनआरडब्ल्यूएचे कर्मचारी हे हमाससोबत मिळून काम करत आहेत. एजेन्सीच्या 19 कर्मचाऱ्यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात भाग घेतला होता. युएनआरडब्ल्यूएचे शेकडो कर्मचारी हमासशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाले आहेत असे इस्रायलने नमूद पेल आहे.