For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायल सेनेची गाझापट्टीत खोलवर धडक

06:56 AM Nov 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
इस्रायल सेनेची गाझापट्टीत खोलवर धडक
Advertisement

ओलीस ठेवलेल्या एका महिला सैनिकाची सुटका करण्यात यश

Advertisement

वृत्तसंस्था / तेल अवीव

गाझा पट्टीत इस्रायली सेनेने खोलवर धडक मारली आहे. हमास या दहशतवादी संघटनेच्या 300 हून अधिक तळांवर हल्ला करुन ती नष्ट केल्याचे प्रतिपादनही करण्यात आले आहे. या नियोजनबद्ध हल्ल्यांमध्ये शेकडो हमास दहशतवादी मारले गेले असावेत असे अनुमान आहे. याशिवाय इस्रायलने गाझा पट्टीवरील विमान हल्लेही सुरुच ठेवले असून आतापर्यंत तेथे 8 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पॅलेस्टाईनी प्रशासनाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Advertisement

रविवारी या युद्धाने चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून शेकडो निरपराधी नागरिकांची हत्या केली होती. तसेच महिलांवर अत्याचार करुन बालकांचे गळे चिरुन त्यांच्या हत्या केल्या होत्या. दहशतवाद्यांच्या या क्रूर आणि अमानुष हत्याकांडानंतर इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझापट्टीचा जवळपास विनाश झाला आहे.

तीन आठवडे सतत वायुहल्ले

गेले तीन आठवडे इस्रायलच्या युद्ध विमानांनी गाझा पट्टीतवर सातत्याने बाँब वर्षाव केल्याने येथील घरे, रुग्णालये, मशिदी, प्रशासकीय कार्यालये, हमासचे तळ आदी स्थाने उध्वस्त झाली आहेत. तसेच किमान 8 हजार नागरीक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर गाझा पट्टीतून अद्यापही नागरीकांचे स्थलांतर होत आहे.

हमासला संपवणारच

हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्ण विनाश करण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे. हमासविरोधातील हे युद्ध बराच काळ चालणार असून ते अवघड आहे. मात्र, अंतिम विजय इस्रायलचाच होईल असा विश्वास त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

भुयारांमध्ये प्रवेश

इस्रायलच्या विशेष प्रशिक्षित कमांडो तुकडीने मंगळवारी गाझा पट्टीत हमासच्या दहशतवाद्यांनी निर्माण केलेल्या भुयारांमध्ये प्रवेश केला. अनेक भुयाने नष्ट केल्याचे प्रतिपादन करण्यात आले. गाझा पट्टीत किमान 500 किलोमीटर लांबीचे भुयारांचे जाळे असावे, अशी शक्यता आहे. हे सर्व जाळे उध्वस्त करण्याचे अभियान हाती घेण्यात आले असल्याचे इस्रायलच्या सैनिक प्रवक्त्याने स्पष्ट केले.

चीनची कृती

चीनने जगाचा इंटरनेट नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात इस्रायलला पुसून टाकण्यात आले आहे. इस्रायलची भूमी पेलॅस्टाईन म्हणून दाखविण्यात आली आहे. इस्रायलने या नकाशाला तीव्र आक्षेप घेतला असून भारताची प्रतिक्रिया अद्याप व्यक्त झालेली नाही. अमेरिकेनेही चीनचा निषेध केला आहे.

मोसाद प्रमुख कतारमध्ये

या युद्धकाळात प्रथमच इस्रायलच्या मोसाद नामक गुप्तहेर संस्थेच्या अध्यक्षांनी रविवारी कतारला भेट दिली होती. इस्रायल आणि इतर देशांच्या 230 हून अधिक नागरीकांचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. त्यांना गाझापट्टीत ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी ही भेट होती असे अनुमान ओ. तथापि, दोन्ही देशांनी या भेटीसंबंधी अधिकृतरित्या काहीही स्पष्ट केलेले नाही.

हमासचा कमांडर ठार

हमास या दहशतवादी संघटनेचा एक महत्वाच्या कमांडर अबु अहजा याला इस्रायलच्या सैनिकांनी ठार केल्याची माहिती देण्यात आली. इस्रायलने गाझा पट्टीत भूमीवरील कारवाईचा प्रारंभ केल्यानंतरचे हे प्रथम मोठे यश आहे. अबु अहजा याच्या हातात दहशतवाद्यांच्या किमान चाळीस तुकड्यांचे नेतृत्व होते.

महिला सैनिकाची सुटका

इस्रायली सैनिकांनी गाझापट्टीत शिरुन एका इस्रायली महिला सैनिकाची सुटका केली आहे. तिला एका इमारतीत ओलीस ठेवण्यात आले होते. इस्रायली सैनिकांच्या एका तुकडीने तिची इमारतीत शिरुन सुटका केली. तिला आता इस्रायलमध्ये आणण्यात आले असून तिची तपासणी करण्यात येत आहे.

युद्ध आघाडीवर दिवसभरात...

ड नागरीकांची हानी कमीत कमी होईल असा प्रयत्न : नेतान्याहू

ड ओलिसांची सुटका होण्याआधी युद्ध थांबविण्यास अमेरिकेचा विरोध

ड हमासच्या भुयारांमध्ये शिरुन इस्रायलच्या सैनिकांची धडक कारवाई

ड एका महिला सैनिकाच्या सुटकेमुळे इस्रायलचा वाढला आत्मविश्वास

Advertisement
Tags :

.