For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेस्ट बँकेत 3 वसाहतींच्या निर्मितीला इस्रायलची मंजुरी

06:48 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेस्ट बँकेत 3 वसाहतींच्या निर्मितीला इस्रायलची मंजुरी
Advertisement

हजारो घरांची होणार उभारणी : तणाव वाढण्याची चिन्हे

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

इस्रायलच्या सरकारने स्वत:च्या कब्जातील पश्चिम किनाऱ्यावर अनेक वस्त्यांध्ये 5295 नव्या घरांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. याचबरोबर वेस्ट बँकेत तीन नव्या वसाहती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलच्या सरकारने पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या भूभागाला ताब्यात घेण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली असल्याचे समजते.

Advertisement

आता नव्या वसाहतींमुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. गाझामध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पश्चिम किनाऱ्यावर पॅलेस्टिनींना इस्रायली सैन्य आणि सेटलर्सच्या वाढत्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पश्चिम किनाऱ्यावर 100 हून अधिक वसाहतींमध्ये 5 लाखाहून अधिक इस्रायली नागरिक राहतात. त्यांचे तेथील वास्तव्य ओस्लो करारात नमूद योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठा अडथळा ठरले आहे. ओस्लो करारानुसार इस्रायलकडून नियंत्रित क्षेत्रांना टप्प्याटप्प्याने पॅलेस्टिनींकडे हस्तांतरित करण्याचे आश्वासन आहे.

इस्रायलने चालू वर्षात आतापर्यंत स्वत:च्या ताब्यातील वेस्ट बँकेमध्ये सुमारे 23.7 चौरस किलोमीटरच्या भूभागाला स्वत:चा घोषित केले आहे. मागील महिन्याच्या अखेरीस जॉर्डनच्या खोऱ्यात 12.7 चौरस किलोमीटरचा भूभाग जप्त करण्याचा निर्णय देखील यात सामील आहे.

Advertisement
Tags :

.