महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायलचा गाझाच्या शाळेवर एअरस्ट्राइक

06:22 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

29 जणांचा मृत्यू : एक आठवड्यात दुसरा हल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

Advertisement

इस्रायलच्या सैन्याने गाझामधील एका शाळेवर एअरस्ट्राइक केला असून यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. एक आठवड्यात इस्रायलकडून दुसऱ्यांदा शाळेवर हल्ला करण्यात आला आहे. शरणार्थींनी आश्रय घेतलेल्या शाळेला इस्रायलने लक्ष्य केल्याचा आरोप हमासकडून करण्यात आला. तर इस्रायलने हा आरोप फेटाळला आहे.

इस्रायलने आता पॅलेस्टिनी लोकांना खान युनिस रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे तेथील 3 मोठ्या रुग्णालयांना बंद करावे लागले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने याला धोकादायक पाऊल ठरविले आहे. तसेच खान युनिसमधून लोकांना बाहेर पडण्यासाठी अधिक मुदत देण्यात यावी, यादरम्यान इस्रायलने शरणार्थींवर हल्ले करू नयेत असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

इस्रायलच्या सैन्याने यापूर्वी शनिवारी गाझामधील एका शाळेवर एअरस्ट्राइक केला होता, यात 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 हून अधिक जण जखमी झाले होते. ही शाळा संयुक्त राष्ट्रसंघाकडून चालविली जात होती, जेथे शरणार्थींनी आश्रय घेतला असा दावा हमासच्या वतीने करण्यात आला. इस्रायलच्या सैन्याने प्रथम शाळेला चहुबाजूने घेरले होते आणि मग त्यावर हवाई हल्ला करण्यात आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयानुसार मृतांमध्ये मुले आणि महिलांचे प्रमाण अधिक होते. 50 जखमींवर उपचार केले जात आहेत. तर इस्रायलच्या सैन्याने शाळेला दहशतवाद्यांचा तळ ठरविले आहे. तर हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेकडो शरणार्थींनी शाळेच्या आसपासच्या जागेपासून दूर जाण्याचा निर्णय घेला आहे.

इस्रायल-हमास युद्ध मागील 9 महिन्यांपासून सुरू आहे. यात आतापर्यंत 38 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 14,500 मुले देखील सामील आहेत. तर गाझामधील सुमारे 80 टक्के लोक बेघर झाले आहेत. हे युद्ध आता इजिप्त सीमेनजीकच्या गाझाच्या राफा शहरापर्यंत पोहोचले आहे. युद्धाच्या प्रारंभी इस्रायलच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पॅलेस्टिनींनी राफामध्ये धाव घेतली होती. या भागात 10 लाखाहून अधिक लोक वास्तवय करत आहेत. इस्रायलचे सैन्य ता तेथेही हल्ले करण्याची योजना आखत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article