कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायलला गाझामध्ये यश, दहशतवादी शरियाचा खात्मा

06:16 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

इस्रायलच्या सैन्याने गाझामध्ये सक्रीय पॅलेस्टिनियन मुजाहिदीन मूव्हमेंटचा (पीएमएम) कमांडर असद अबू शरियाला कंठस्नान घातले आहे. असद अबू शरिया 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांमध्ये सामील होता. हमासच्या नेतृत्वात झालेल्या या हल्ल्यात 1200 जणांना जीव गमवावा लागला होता. तर दहशतवाद्यांनी 250 जणांचे अपहरण करत त्यांना ओलीस ठेवले होते.

Advertisement

पीएमएम आणि याची सशस्त्र शाखा मुजाहिदीन ब्रिगेडचे नेतृत्व करणारा असद अबू शरियाला सुरक्षा दलांनी शिन बेट या सुरक्षा यंत्रणेसोबत मिळून राबविलेल्या संयुक्त मोहिमेत कंठस्नान घातले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझाच्या सबरा क्षेत्रात शरियाच्या घराला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याच्या काही तासांनी पीएमएमने शरिया आणि त्याचा भाऊ अहमद अबूच्या मृत्यूची पुष्टी दिली. इस्रायलच्या हल्ल्यात कमीतकमी 15 जण मारले गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्sय शरिया आणि त्याच्या कुटुंबाचे सदस्य सामील होते.

इस्रायलच्या किबुत्ज नीर ओजवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये शरिया सामील होता. तसेच तो थेट स्वरुपात शिरी, एरियल आणि कफिर बिबासचे अपहरण आणि हत्यांमध्ये सामील होता. कफिर हा अपहरण करण्यात आलेल्या ओलिसांमध्ये सर्वात कमी वयाचा होता. तसेच हमासकडून मारले गेलेला सर्वात कमी वयाचा ओलीस होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article