जादूटोण्यासाठी प्रसिद्ध बेट
ठिकठिकाणाहून उपचार करविण्यासाठी येतात लोक
जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांना भूतांचं घर किंवा भूतांचा अ•ा म्हटले जाते. काही शहरं तर भुताटकीसाठी ओळखली जातात. परंतु एक बेटाला जादुटोण्यासाठी ओळखले जाते, लोक येथे उपचार करवून घेण्यासाठी येतात, तर काही लोक स्वत:च्या पूर्वजांशी कथित संवाद साधण्यासाठी येत असतात.
सिकिउजोर हे स्वत:च्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथे भूत-प्रेत, जादूटोण्याद्वारे प्रत्येक रोगावर उपचार केला जात असल्याचा दावा केला जातो. येथे लोक दूरवरून स्वत:वर उपचार करवून घेण्यासाठी येत असतात.
नैसर्गिक सौंदर्य असूनही येथे पर्यटन व्यवसाय बहरलेला नाही. आसपासच्या बेटांवरून लोक येथे येण्यास घाबरतात. अलिकडेच स्पॅनिश इन्फ्लुएंसर रुबेन होलगादो येथे एका जुन्या रिसॉर्टमध्ये अतिथी म्हणून आला, तेव्हा त्याला नुतनीकरण सुरू असलेल्या या रिसॉर्टमध्ये तो एकटाच ग्राहक असल्याचे आढळून आले. रिसॉर्ट एका महालाप्रमाणे मोठा होता, परंतु त्यात काहीच नव्हते.
येथील लोकांना आत्मा आणि भूत-प्रेतांवर विश्वास आहे. सिकिउजोरमध्ये वाईट आत्मे प्रत्येक ठिकाणी आहेत, ते झरे, जंगल आणि समुद्रांमध्ये देखील आहेत. जर त्यांना छेडले तर ते आजार, शाप तसेच मारून टाकून सूड उगवत असतात असे स्थानिक गाइड लुईस नाथनियल बोरोंगनचे सांगणे आहे.
येथील भूत-प्रेतांसह येथे जादूटोणा आणि त्यावरील उपचार खासकरून जगभरात प्रसिद्ध आहे. ही एक खास प्रकारची चिकित्सा पद्धती असून ज्यात जादूटोणा आणि वनौषधींचा अनोखा संगम आहे. याला स्थानिक लोकांसोबत कॅथोलिक धर्म मानणाऱ्या स्पॅनिश प्रवाशांनी सुरू केले होते.
ठिकठिकाणाहून येणारे लोक अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक समस्यांवर उपायांसाठी येतात आणि त्यांना येथील स्थानिक नैसर्गिक आणि अन्य चिकित्सा पद्धतींवर मोठा विश्वास आहे. परंतु येथील भूतप्रेतांची दहशत देखील कमी नाही. येथे चिकित्सक स्वत:च्या उपचारासाठी पैसे घेत नाहीत.