For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्लामिक स्टेटची भारतीयांना धमकी

06:51 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्लामिक स्टेटची भारतीयांना धमकी
Advertisement

गजनवी राज’साठी तयार राहण्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ काबूल

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी स्वत:चे नियतकालिक व्हॉइस ऑफ खोरासानच्या नव्या अंकात भारत आणि जगभरातील मुस्लिमांना हिंदूंचा नरसंहार करण्यास सांगण्यात आले आहे. याचबरोबर इस्लामिक स्टेटने मध्यकालीन मुस्लीम आक्रमणकारी म हमूद गजनवी आणि मुहम्मद बिन कासिमबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. भारतीयांनी पुन्हा एकदा गजनवी राजसाठी तयार रहावे असे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे.

Advertisement

इस्लामिक स्टेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य भाजप नेत्यांना इस्लामचे शत्रू असे संबोधिले आहे. अफगाणिस्तानात सक्रीय असलेल्या इस्लामिक स्टेटच्या द हशतवाद्यांना सध्या पाकिस्तानच्या सैन्याकडून मदत मिळत आहे. पाकिस्तानी सैन्य आता इस्लामिक स्टेटचा प्याद्याप्रमाणे वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक देशांना मानणाऱ्या भारतीयांनी आता महमूद गजनवीला पुन्हा सामोरे जाण्यासाठी तयार रहावे असे व्हॉइस ऑफ खोरासानच्या मुखपृष्ठावर नमूद आहे. गजनवीने भारतात सोमनाथ मंदिर तोडत अनेकदा हल्ले केले होते. तसेच इस्लामिक स्टेटने भारतीय मुस्लिमांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय मुस्लीम हिंदूंवर हल्ला करण्यास सक्षम नसल्यास जगभरातील मुस्लिमांनी एकजूट होत भारतावर हल्ला करावा असे प्रक्षोक्षक लिखाण इस्लामिक स्टेटकडून करण्यात आले आहे.

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी भाजप नेत्यांच्या विरोधात गरळ ओकली आहे. खास करून नरेंद्र मोदींना इस्लामिक स्टेटने या लेखात लक्ष्य केले आहे.  राम मंदिर उभारणीबद्दल इस्लामिक स्टेटने गरळ ओकली आहे. तसेच हैदराबाद मतदारसंघात असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या भाजप उमेदवार माधवी लता आणि नुपूर शर्मा यांनाही लेखाद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे.

सौदी अरेबियावरही टीका

इस्लामिक स्टेटने सौदी अरेबियावरही जोरदार टीका केली आहे. आधुनिकीकरण आणि व्यापाराच्या नावावर अरब देशांचे पाश्चिमात्यकरण होत आहे. यात सौदी अरेबियातील मनोरंजन केंद्र आणि अन्य आयोजनांचा उल्लेख इस्लामिक स्टेटकडून करण्यात आला.

पाकिस्तानकडून रसद

अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेट सक्रीय आहे. पाकिस्तानच्या मदतीने इस्लामिक स्टेट आता क्षेत्रात कारवाया घडवून आणू पाहत आहे. तालिबानच्या विरोधात पाकिस्तानकडून इस्लामिक स्टेटला बळ पुरविले जात आहे. तालिबानने पाकिस्तानच्या तालावर नाचण्यास नकार दिला आहे. याचमुळे पाकिस्तान आता इस्लामिक स्टेटद्वारे तालिबानला घायाळ करू पाहत आहे. तालिबान आणि इस्लामिक स्टेट यांच्यातील संघर्ष आता चिघळू लागला आहे.

Advertisement
Tags :

.