महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्लामिक स्टेटची तालिबानच्या प्रमुखाला धास्ती

06:25 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंधारमध्ये संरक्षक भिंतीची निर्मिती : हल्ल्याचा धोका

Advertisement

वृत्तसंस्था/ कंधार

Advertisement

तालिबानचा प्रमुख हैबतुल्ला अखुंदजादा हा दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटपासून निर्माण झालेल्या धोक्यामुळे भयभीत झाला आहे. याचमुळे तालिबानने कंधार शहरात ईदगाह मशिदीच्या चहुबाजूला संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात केली आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी ईदच्या सामूहिक प्रार्थनेवेळी आत्मघाती हल्ला करवू शकतात अशी भीती तालिबानला सतावत आहे. या सामूहिक प्रार्थनेत अखुंदजादा सामील होत असतो. इस्लामिक स्टेटने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान आणि रशियात भीषण हल्ले घडवून आणले आहेत. यामुळे तालिबानने अखुंदजादाची सुरक्षा वाढविली आहे.

तालिबानच्यया सैन्याने आता कंधार मशिदीच्या आसपास गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. ईदच्या सामूहिक प्रार्थनेवेळी हल्ला होण्याची भीती तालिबानी अधिकाऱ्यांना सतावत आहे. याचमुळे ही सामूहिक प्रार्थना कुठे होणार याची घोषणा करणे तालिबानने अद्याप टाळले आहे.

आयएसआयचा पाठिंबा

आयएसचा धोका पाहता तालिबानने सुरक्षा वाढवत स्वत:च्या गुप्तचर यंत्रणेला सक्रीय केले आहे. इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानात स्वत:चा प्रभाव वाढविला आहे. कंधारच्या मुख्य तुरुंगातही सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय तालिबानने घेतला आहे. यापूर्वी कंधारमध्ये इस्लामिक स्टेटने केलेल्या हल्ल्यात 43 जण मारले गेले होते. इस्लामिक स्टेटला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तान तालिबानवर दबाव टाकण्यासाठी इस्लामिक स्टेटचा वापर करत आहे. तालिबानच्या राजवटीवर नाराज असलेल्या लोकांची इस्लामिक स्टेट भरती करत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article