For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्ये इस्लामी प्रचारकाला जन्मठेप

06:42 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्ये इस्लामी प्रचारकाला जन्मठेप
Advertisement

दहशतवादी संघटना चालविल्याप्रकरणी दोषी

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनमधील इस्लामिक कट्टरवादी नेता अंजेम चौधरीला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वूलविच क्राउन न्यायालयाने मागील आठवड्यात अंजेम चौधरीला द्वेषपूर्ण भाषणांद्वारे लोकांना चिथावणी देणे आणि अल-मुहाजिरोना (एएलएम) नावाची दहशतवादी संघटना चालविल्याप्रकरणी दोषी ठरविले होते.

Advertisement

अंजेम चौधरीच्या दहशतवादी संघटनेचे उद्दिष्ट शरीया कायद्याला पूर्ण जगात फैलावणे असल्याचे ब्रिटिश न्यायालयाने म्हटले आहे. अल-मुहाजिरोनला एक दशकापूर्वीच ब्रिटनमध्ये प्रतिबंधित करण्यात आले होते. तरीही तो वेगवेगळ्या नावांनी ही संघटना चालवित होता. अंजेमला आता वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत तुरुंगात रहावे लागणार आहे. म्हणजेच 57 वर्षीय अंजेमला 28 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

अल-मुहाजिरोनचा प्रमुख

अंजेम चैधरी हा प्रारंभापासून अल-मुहाजिरोनच्या प्रमुख सदस्यांपैकी एक आहे. या संघटनेवर अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप आहे. याच्याशी निगडित दहशतवाद्यांनी ब्रिटनसोबत अन्य देशांमध्येही दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. अंजेम हा 2014 मध्ये अल-मुहाजिरोनचा प्रमुख झाला होता. या संघटनेचा प्रमुख राहिलेला उमर बकरी मोहम्मदला लेबनॉनच्या तुरुंगात डांबण्यात आले हेते, ज्यानंतर अंजेमने या संघटनेची धुरा हाती घेतली होती. अंजमेला 2016 मध्ये सीरियात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी साडेपाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु 2018 मध्ये त्याची मुक्तता करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यावर अंजेमने सोशल मीडियावरून स्वत:च्या फॉलोअर्सना चिथावणी देण्यास सुरुवात केली होती.

पाकिस्तानी वंशाचा दहशतवादी

अंजेम हा पाकिस्तानी वंशाचा असून तो स्वत:च्या फॉलोअर्सना हिंसेसाठी प्रवृत्त करत होता. याचदरम्यान अमेरिका आणि कॅनडाच्या यंत्रणांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या यंत्रणांनी मिळून गुप्त चौकशीनंतर हिथ्रो विमानतळावर त्याला अटक केली होती.

9/11 हल्ल्याचे कौतुक

अंजेमने 9/11 हल्ल्याला ‘इतिहासातील सर्वात मोठा दिवस’ संबोधिले होते आणि संबंधित दहशतवाद्यांचे कौतुक केले होते. ब्रिटिश राजमहाल बकिंगहॅम पॅलेसला मशिदीत रुपांतरित करू इच्छित असल्याचे त्याने जाहीरपणे म्हटले होते.  अंजेमचे आईवडिल 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून ब्रिटनमध्ये दाखल झाले होते. अंजेमने कायद्याचे तसेच वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. 90 च्या दशकात तो कट्टरवादी विचारसरणी असलेल्या लोकांच्या संपर्कात आला होता.

Advertisement
Tags :

.