कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘इस्कॉन’च्या चिन्मय दास यांना जामीन मंजूर

06:22 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बांगलादेश न्यायालयाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेशच्या एका न्यायालयाने बुधवारी देशद्रोहाच्या प्रकरणात इस्कॉनचे माजी नेते चिन्मय कृष्णा दास यांना जामीन मंजूर केला. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सत्ता बदलल्यापासून तेथील अल्पसंख्याक हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात चिन्मय दास एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आले होते. चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर त्यांचे अनुयायी रस्त्यावर उतरले होते. तसेच भारतानेही या प्रकरणाबाबत बांगलादेशातील अल्पसंख्याकांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

चिन्मय कृष्ण दास हे सनातन जागरण मंचचे प्रवक्ते आणि चितगाव इस्कॉनचे नेते आहेत. ते 2016 ते 2022 पर्यंत इस्कॉनचे चितगाव विभागीय सचिव होते. तसेच 2007 पासून चितगावमधील हथजारी येथील पुंडरिक धामचे प्राचार्य देखील आहेत.

गेल्यावर्षी 25 ऑक्टोबर 2024 रोजी चिन्मय आणि इतर 18 जणांवर चितगावमधील न्यू मार्केट चौकात बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजावर भगवा ध्वज फडकवल्याचा आरोप होता. 30 ऑक्टोबरच्या रात्री चिन्मय आणि इतर 18 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article