महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयएसआय’चे दहशतवाद्यांसोबत पीओकेमध्ये गुफ्तगू

06:21 AM Sep 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्याचे कट-कारस्थान : दहशतवादी घुसखोरीच्या पवित्र्यात : भारतीय यंत्रणा दक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये शांततेच्या वातावरणात विधानसभा निवडणुका होत आहेत. मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून आता शेवटच्या टप्प्याचे मतदान बाकी आहे. याचदरम्यान, खोऱ्यात दहशतवादाचा धोकाही निर्माण झाला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय दहशतवाद्यांच्या मदतीने खोऱ्यातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय गुप्तचर विभागाने जम्मू-काश्मीरबाबत एक महत्त्वाचा अलर्ट जारी केला असून लष्कर-ए-तोयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी पीओकेमध्ये तळ ठोकून असल्याचे स्पष्ट केले आहे. हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसून घातपाती कारवाया करण्याच्या पवित्र्यात असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने अलीकडेच पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गटासोबत भारतविरोधी बैठक घेतली होती. आयएसआयच्या प्रतिनिधीने 29 ऑगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील खुरट्टा येथे काही दहशतवाद्यांसोबत बैठक घेतल्याचे भारतीय गुप्तचर विभागाचे म्हणणे आहे. या बैठकीत जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश कसा करायचा, कसा आणि कुठे हल्ला करायचा यासंबंधीची रुपरेषा या बैठकीत तयार करण्यात आल्याची माहितीही भारतीय गुप्तचर विभागाच्या हाती लागली आहे.

भारतात हल्ला करण्याच्या इराद्याने लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या 2 ते 3 दहशतवाद्यांचा एक गट पीओकेच्या दुधीनाल सेक्टरमधून कुपवाडा सेक्टरमध्ये घुसला आहे. एवढेच नाही तर पीओकेमधील गबदोरी गावातील लॉन्च पॅडवर जैश-ए-मोहम्मदचे काही दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. हे सर्व दहशतवादी एके सीरीजची शस्त्रे, पिस्तूल आणि ग्रेनेडने सुसज्ज आहेत. ते जम्मू काश्मीरमध्ये कधीही घुसखोरी करू शकतात. या सर्वांचा काश्मीर खोऱ्यात दहशत घडवण्याचा इरादा असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

गुप्तचर संस्थांच्या या महत्त्वपूर्ण इनपुटमुळे पाकिस्तान आणि आयएसआयचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. सद्यस्थितीत आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे. भारताविऊद्ध विशेषत: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र, भारतीय सुरक्षा यंत्रणाही पूर्ण अलर्ट मोडमध्ये आहेत. दहशतवाद्यांचा प्रत्येक कट हाणून पाडण्यासाठी जवान सीमेवर सतर्कतेने तैनात आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article