राजनंदिनी’च्या भूमिकात इशिता राज
वेबसीरिजमधील पहिला लुक सादर
‘कंधार : द बॅटल ऑफ सिल्क रुट’चा फर्स्ट लुक सादर करण्यात आला असून यात सीरिजची नायिका राजनंदिनीच्या स्वरुपात दिसून आलेल्या इशिता राजने सर्वांना चकित केले आहे. शौर्य, विश्वासघात आणि न्यायाच्या विषयांना स्पर्श करणारी ही कहाणी लाहौराच्या एका अत्यंत साहसी राजकन्या राजनंदिनीवर आधारित आहे. यात राजनंदिनी ही व्यक्तिरेखा इशिता राजने साकारली आहे. या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन शाहिद काजमी यांनी केले आहे.
या सीरिजचा ट्रेलरही सादर करण्यात आला असुन याची सुरुवात रजा मुराद यांच्या आवाजाने होते. या सीरिजकरता निर्मात्यांच्या टीमने मोठी मेहनत घेत कहाणीला अंतिम स्वरुप दिले असल्याचे काजमी यांनी सांगितले आहे. 1390 च्या काळातील ही कहाणी एक ऐतिहासिक नाट्या आहे. कंधारमधील शूर कन्या राजनंदिनीविषयी ही वेबसीरिज आहे. राजनंदिनीने स्वत:च्या शौर्याद्वारे इतिहासात स्वत:चे नाव नेंदविल्याचे या सीरिजमध्ये दाखविले जाणार आहे.
राजनंदिनीची व्यक्तिरेखा माझ्या कारकीर्दीतील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. आम्ही सर्वांनी यावर मोठी मेहनत केली आहे. ऐतिहासिक भूमिका साकारणे कलाकारासाठी आव्हानात्मक असते, मी देखील या आव्हानाला सामोरी गेली असून याचा परिणाम आता प्रेक्षकांसमोर आहे. ही सीरिज लवकरच एक आंतरराष्ट्रीय ओटीटीवर पहायला मिळणार असल्याचे इशिताने सांगितले आहे.